Pune Sextortion News Saam TV
मुंबई/पुणे

Pune Sextortion News: धक्कादायक! पुण्यात 64 वर्षांचे आजोबा सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात; ४ लाखाला घातला गंडा, video कॉल केला अन्...

Pune Crime News: पुण्यामध्ये व्हिडिओ कॉल करत फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे..

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

>>सचिन जाधव, पुणे

Pune Crime News: गेल्या काही महिन्यांपासून पुणे शहरात सेक्सॉर्टशनच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. काही महिन्यांपुर्वी सेक्सॉर्टशनला बळी पडून २२ वर्षीय तरुणान आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. अशाच प्रकारची आणखी एक घटना समोर आली आहे. ज्यामध्ये ६४ वर्षीय वृद्धाची तब्बल ४ लाखांची फसवणूक झाली आहे.(Latest Marathi News Update)

याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यातील एका ६४ वर्षीय आजोबांना व्हिडिओ कॉल करुन न्यूड होण्यास भाग पाडले. त्यानंतर हा कॉल व्हायरल करण्याची धमकी देत लाखो रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. २१ ते २५ मार्च दरम्यान ही घटना घडली आहे. याप्रकरणी मॉडेल कॉलनीतील गोखलेनगरमधील एका ६४ वर्षीय नागरिकाने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या घरी असताना एका तरुणीने त्यांना व्हॉटसअ‍ॅपवर व्हिडिओ कॉल केला. त्यांच्याशी चॅटिंग आणि व्हिडिओ कॉल केले. तसेच त्यांना अश्लिल व्हिडिओ दाखवत न्यूड होण्यास भाग पाडले. हा संपूर्ण कॉल सुरू असतानाच त्याचे स्क्रिन रेकॉर्डिंग करुन व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली.

यावेळी आणखी एका आरोपीकडून पोलिस असल्याचे सांगत धमकावण्यात आले. तसेच हा व्हिडिओ डिलीट करण्यासाठी ४ लाख ६६ हजारांची रक्कम घेण्यात आली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संबंधित नागरिकाने पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी पुण्याच्या चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.. (Pune Crime News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: यवतमाळ शहरात रात्री विचित्र अपघात, कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने घडली घटना

Monday Horoscope : पैशाची तंगी दूर होणार; 5 राशींचे भाग्य उजळणार, वाचा आजचे राशीभविष्य

Pregnancy Glow: काय असतं 'प्रेग्नन्सी ग्लो', खरोखरच त्वचा अधिक टवटवीत होते का?

Accident News: माथेरानच्या घाट रस्त्यावर भीषण अपघात; 20 पर्यटकांना घेऊन जाणारा टेम्पो टर्न घेताना उलटला

मुंबई हादरली! सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार

SCROLL FOR NEXT