अक्षय बडवे, प्रतिनिधी...
Pune Crime News: पुणे मेट्रोच्या कामासाठी लागणाऱ्या साहित्याची चोरी करणाऱ्या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये तीन महिलांचाही समावेश असून चोरीचे साहित्य विक्री करण्याच्या तयारीत असताना चतु:शृंगी पोलिसांनी (ChatuShrungi Police) ही कारवाई केली आहे. आरोपींकडून चोरी केलेले सर्व साहित्य जप्त करण्यात आले आहे. (Crime News In Marathi)
याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यातील (Pune) बाणेर, बालेवाडी परिसरातील सध्या मेट्रो खांबासाठी लागणाऱ्या लोखंडी पट्ट्या चोरट्यांनी पळवल्या होत्या. अनिल सुजान काळे आणि दीपक मारूती काळे अशी या आरोपींची नावे आहेत.
हे चोरलेले साहित्य अनिल आणि दीपक हे औंधमधील (Aundh) ज्युपिटर रुग्णालयाच्या परिसरातील भंगार लोखंडी पट्ट्या विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोघांनाही अटक करण्यात आली. (Latest Crime News)
तर दुसरीकडे मेट्रो साहित्याची चोरी केल्याप्रकरणी (Pune Metro) पोलिसांनी तीन महिलांना अटक केली आहे. या महिलांनी गणेशखिंड रस्त्यावर आचार्य आनंदऋषीजी चौकात सुरू असलेल्या मेट्रोच्या कामाच्या ठिकाणावरुन सळई, नट असे साहित्य चोरले होते. पोलिसांनी संबंधित महिलांना अटक केली असून चोरीचा माल कोणाला विकला याबाबत आता अधिक तपास पोलिस करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.