Pune Police  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: डाव रंगत आला पण तेवढ्यात..., जुगार अड्ड्यावर छापेमारी; पोलिस अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले

Pune Police: पुण्यामध्ये रेव्ह पार्टीनंतर आता जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. या प्रकरणात पोलिसांनी ३३ जणांना अटक केली. आरोपींमध्ये सहाय्यक पोलिस फौजदाराचा देखील समावेश आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली.

Priya More

Summary -

  • नारायण पेठेतील वाहनतळावर ३३ जणांना जुगार खेळताना रंगेहाथ पकडले.

  • सहाय्यक पोलिस फौजदार महेश भुतकर यांचा सहभाग समोर आल्याने खळबळ.

  • विश्रामबाग पोलिसांनी छापा टाकून रोख रक्कम आणि जुगार साहित्य जप्त केले.

  • पोलिस दलाची प्रतिमा मलीन केल्याने महेश भुतकर यांना निलंबित करण्याची कारवाई.

अक्षय बडवे, पुणे

पुण्यात झालेल्या रेव्ह पार्टी प्रकरणाची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. खराडीतील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर छापा टाकत पोलिसांनी सात जणांना अटक केली होती. आरोपींमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांच्या जावयाचा देखील समावेश आहे. हे रेव्ह पार्टीचे प्रकरण ताजे असतानाच पुणे पोलिसांनी आणखी एका ठिकाणी छापेमारी केली. जुगार अड्ड्यावर पोलिसांना छापा टाकला. या प्रकरणात सहाय्यक पोलिस फौजदारासह ३३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डाव रंगत आला पण तेवढ्यात पुण्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापेमारी केली. या छाप्यात सहायक पोलिस फौजदाराला पोलिसांनी रंगेहाथ पडकडले. पुण्यातील नारायण पेठेत वाहनतळामध्ये हा जुगार सुरु होता. जुगार खेळताना सहाय्यक पोलिस फौजदारसह ३३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील हरिभाऊ साने वाहनतळावर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला.

जुगार खेळणार्‍या ३३ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यात पोलिस मुख्यालयातील सहाय्यक पोलिस फौजदाराचाही सहभागी आहे. महेश महादेव भुतकर असे या सहाय्यक पोलिस फौजदाराचे नाव आहे. ते सध्या मुख्यालयातील सी कंपनीत कार्यरत होते. पोलिसांनी प्रविण काशिनाथ बोदवडे यांच्यासह ३३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा जुगार अड्डा विजय महाडिक हा चालवत असून त्याच्यावर यापूर्वीही अनेकदा कारवाई केली आहे.

विश्रामबाग पोलिसांना नारायण पेठेतील हरीभाऊ साने वाहनतळामध्ये काही जण पैसे लावून रम्मी हा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी या वाहनतळाला वेढा देऊन छापा टाकला. त्यात वाहनतळाच्या टेरेसवरील खोलीमध्ये ३३ जण जुगार खेळताना आढळून आले. त्यांच्याकडून खेळातील जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या ३३ जणांमध्ये सहाय्यक पोलिस फौजदाराला पडकड्यात आल्यामुळे खळबळ उडाली. त्यासंबंधीचा अहवाल विश्रामबाग पोलिसांनी दिला आहे. अशोभनीय वर्तन करुन पोलिस दलाची प्रतिमा मलीन केल्याने भूतकर यांना निलंबित करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Soaked Walnut Vs Dry Walnuts: भिजवलेले की सुके, मेंदूच्या आरोग्यासाठी कोणते अक्रोड बेस्ट?

Palak Paratha Recipe: नाश्त्यासाठी बनवा हेल्दी, पौष्टिक आणि चविष्ट पालक पराठा, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळ्यात भाऊसाहेब चव्हाण यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला

Congress Protest Live Update : राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीचा थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत मेगा मोर्चा; दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा

ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹३,००० रुपये जमा होणार? मोठी अपडेट समोर; २,१00 रुपयांवर सरकारचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT