Pune Crime Saamtv
मुंबई/पुणे

Pune Crime: पैशाच्या वादात मैत्रीचाही विसर.. डोक्यात सिलेंडर घालून मित्राची हत्या; पुण्यात खळबळ

Pune Latest News: चार दिवसाच्या कामाचे पैसे दिले नाही म्हणून मित्रानेच मित्राची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

Gangappa Pujari

सचिन जाधव, प्रतिनिधी...

Pune Wagholi Crime: पुणे शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पैशाच्या वादातून मित्रानेच मित्राचा खून केल्याची घटना पुण्याच्या वाघोली परिसरत उघडकीस आली. या धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Crime News In Marathi)

याबाबत अधिक माहिती अशी की, चार दिवसाच्या कामाचे पैसे दिले नाही म्हणून मित्रानेच मित्राची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. वाघोली (Wagholi) केसनंद रोडवरील सिंट्रोस सोसायटी जवळील लेबर कॅम्पजवळ हा धक्कादायक प्रकार घडला. शैलेश रमेश मांडगीकर (वय वर्षे 25) असे हत्या झालेल्या मृत तरुणाचे नाव असून तो नांदेड (Nanded) जिल्ह्यातील देगलुर तालुक्याच्या मांडगी गावचा रहिवासी आहे.

तर श्रीराम गोपाळ कोटलापुरे असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव असून तो सध्या फरार आहे. पैशावरुन दोघांमध्ये वाद झाल्यानंतर आरोपीने डोक्यात गॅस सिलेंडर मारुन शैलेश मांडगीकर याला जखमी केले. ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.

टोळक्याच्या त्रासाला कंटाळून संपवले आयुष्य...

नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शहा गावात श्री भैरवनाथ हायस्कूलमध्ये दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या १७ वर्षीय विद्यार्थीनीने स्वतःच्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. वैष्णवी नवनाथ जाधव असे या मुलीचे नाव असून आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत गावातील तीन तरुणांकडून त्रास होत असल्याचे विद्यार्थीनीने नमूद केले होते. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कोणत्या भाज्यामध्ये सुकं खोबरं वापरू नये? भाजीची चव बिघडेल

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचा २२वा हप्ता कधी मिळणार? ₹२००० कधी येणार? तारीख आली समोर

Nora Fatehi Accident: मोठी बातमी! बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीचा अपघात

Navi Mumbai Politics: शरद पवार गटाला मोठा धक्का; बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

Maharashtra Election: भाजपची इन्कामिंग एक्सप्रेस सुसाट,पुण्याचे माजी महापौर हाती घेणार कमळ?

SCROLL FOR NEXT