Khadakwasla Dam Saamtv
मुंबई/पुणे

Pune Crime: 'मी आयुष्य संपवतोय...' मित्राला चिठ्ठी पाठवून तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; कुटूंबीयांवर शोककळा

Khadakwasla Dam: २५ मे रोजी पहाटेच्या सुमारास अनिकेत कोणालाही काही न सांगता घरातून निघून गेला होता.

Gangappa Pujari

सचिन जाधव, प्रतिनिधी...

Pune Crime News: 'मी आत्महत्या करत आहे ,माझ्या मृत्यूस कोणालाही जबाबदार धरु नये' अशी चिठ्ठी लिहून तरुणाने खडकवासला धरणात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अनिकेत सुनील आल्हाट (वय 21, रा. नऱ्हे,पुणे) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे...

याबाबत अधिक माहिती अशी की, २५ मे रोजी पहाटेच्या सुमारास अनिकेत कोणालाही काही न सांगता घरातून निघून गेला होता. त्याने कागदावर आत्महत्या करत असल्याचे व त्याबाबत कोणालाही जबाबदार न धरण्याचे लिहून ती चिठ्ठी मित्राच्या व्हॉट्सॲपवर पाठवली होती. (Latest Marathi News)

मित्राने ही बाब तातडीने अनिकेतच्या नातेवाईकांना सांगितली. तसेच कुटूंबियांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharati Vidyapith Police Station) हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.

घरातून निघून गेल्यानंतर अनिकेतने मोबाईल बंद करून ठेवल्याने त्याचा संपर्क होत नव्हता. अनेक ठिकाणी कुटूंबियांनी शोधाशोधही केली. अखेर अनिकेतचा मृतदेह खडकवासला धरणाच्या पाण्यावर पंप हाऊस जवळ तरंगताना आढळून आला. ज्यानंतर त्याने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. या धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून कुटूंबियांवर दुखःचा डोंगर कोसळला आहे. (Pune News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ahilyanagar News: सीएनजी पंपावर कर्मचाऱ्यांची मुजोरी; वाहनात गॅस भरण्यावरून दाम्पत्याला मारहाण

Maharashtra Politics: महायुतीतील कुरघोडीमुळे शिंदे नाराज? शिंदे पुन्हा दिल्ली दरबारी

Bihar Election : निवडणुकीआधीच मुख्यमंत्र्यांची मोठी कारवाई; सत्ताधारी पक्षाने माजी मंत्र्यांसहित ११ आमदारांना केलं निलंबित

Eye Health: वारंवार डोळे चोळण्याची सवय आहे? तर वेळीच थांबवा, नाहीतर...

धनंजय मुंडेंना दणका! गोपीनाथ मुंडेंचे वारसदार कोण? पंकजा घेतली या दोन नेत्यांची नावे|VIDEO

SCROLL FOR NEXT