Pune Police News Saamtv
मुंबई/पुणे

Pune Crime News: थेट कॉलेजमध्ये कोयता काढून माजवली दहशत; पोलिसांनी त्याच परिसरात धिंड काढून तरुणाचा उतरवला माज

कॉलेजमध्ये दहशत राहावी तसेच काही भांडणाच्या कारणामुळे त्याने थेट कॉलेजमध्ये कोयता काढून दहशत माजवली

Gangappa Pujari

अक्षय बडवे, प्रतिनिधी...

Pune Crime News: पुण्यातील (Pune Crime) गुन्हेगारी दिवसेंदिवस चिंतेचा विषय ठरताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच पुण्यातील सदाशिव पेठेत एका तरुणीवर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. या घटनेत दोन तरुणांच्या धाडसामुळे मोठा अनर्थ टळला. ही धक्कादायक घटना ताजी असतानाच एका मुलाने थेट कॉलेजमध्ये कोयता काढल्याचे प्रकरण समोर आले आहे. ज्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. (Crime News In Marathi)

काय आहे संपूर्ण प्रकरण?

याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यातील सदाशिव पेठेत (Sadashiv Peth) तरुणीवर झालेल्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच आता एका तरुणाने थेट कॉलेजमध्येच कोयता काढल्याचे प्रकरण समोर आले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.कुणाल कानगुडे (१९) असे या आरोपी तरुणाचे आहे.

काही दिवसांपूर्वी त्याचा पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयात डॅनी या तरुणाशी काही वाद झाला होता. त्यानंतर कॉलेजमध्ये दहशत राहावी तसेच काही भांडणाच्या कारणामुळे त्याने थेट कॉलेजमध्ये कोयता काढून दहशत माजवली. (Pune Crime News)

याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनेची गांभीर्याने दखल घेत तरुणाला अटक केली आहे. दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी तरुणाला चांगलाच धडा शिकवला आहे. अशा घटनांना आळा बसण्यासाठी पोलिसांनी डेक्कन परिसरातून त्याची धिंड काढली. या घटनेची सध्या परिसरात चांगलीच चर्चा होत असून पोलिसांच्या धडक कारवाईचे कौतुक होत आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Matka King Review : विजय वर्माचा 'मटका किंग' पास की फेल? प्रेक्षकांना कसा वाटला?

Kalyan Tourism : प्राचीन भिंती अन् भक्कम दरवाजे, कल्याणमधील 'हा' किल्ला जपतोय ऐतिहासिक वारसा

Ladki Bahin Yojana: उरला फक्त शेवटचा आठवडा! लाडक्या बहिणींनो आताच eKYC करा, अन्यथा ₹१५०० कायमचे बंद होणार; प्रोसेस वाचा

Rain Alert : राज्याला अवकाळीचा तडाखा, वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस; मुंबई, ठाणेसह २४ जिल्ह्यांसाठी पुढील काही तास महत्त्वाचे

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये तिसऱ्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली, महिलेसह ३ चिमुकले गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT