Maharashtra Rain Forecast : सिंधुदुर्ग, कोल्हापूरमध्ये ऑरेंज अलर्ट; मुंबई, पुण्यासह उर्वरित महाराष्ट्रात कसा असेल पाऊस?

Weather Forecast : गुजरातपासून केरळपर्यंत किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे.
Monsoon 2023
Monsoon 2023SaamTv
Published On

अक्षय बडवे

Monsoon 2023 Update : राज्यात मान्सून सर्वदूर सक्रीय होताना दिसत आहे. राज्यातील विविध भागांमध्ये कमी जास्त प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे. अनेक भागांमध्ये पेरण्यांची लगबग सुरु झाली आहे. मात्र काही भागात शेतकरी अजूनही जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

राज्यात मॉन्सून सक्रीय असून मागील काही दिवसांपासून कोकणात पावसाने जोरदार हजेरी लागली आहे. आजही कोकणात पावसाचा जोर कायम राहणार आहे. गुजरातपासून केरळपर्यंत किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. त्यामुळे किनारपट्टी भागात पावसाच्या सरी बरसण्याचा अंदाज आहे.

Monsoon 2023
Raigad News : पावसाचा जाेर वाढला... वरंध घाटात 'या' वाहनांना 30 सप्टेंबरपर्यंत बंदी

घाटमाथ्यावरील स्थिती

पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा तर सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट असून, उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

पुण्यात स्थिती जैसे थे

सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील आठवडाभर पुणे शहरात पावसाची स्थिती ‘जैसे थे’ राहत घाटमाथ्यावर मुसळधार ते अती जोरदार पावसाची शक्यता हवामा विभागाने वर्तवली आहे. (Latest Marathi News)

Monsoon 2023
Mumbai News : मोबाईलवर गेम खेळणं जीवावर बेतलं? अमेरिकेतील प्रसिद्ध डॉक्टरच्या‌ मुलाचा 22 व्या मजल्यावरून पडून मृत्यू

विदर्भ आणि मराठवाड्यात 5 जुलै रोजी मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. 3, 4 आणि 5 जुलै रोजी मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि उपनगरात मात्र यलो अलर्ट देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com