मुंबई/पुणे

Pune Crime: पुणे हादरलं! १८ वर्षीय प्रेयसीवर चाकूने हल्ला, प्रेमाचा थरारक शेवट

Hinjawadi Crime News: पुण्यातील हिंजवडीमध्ये प्रेमसंबंधातून १८ वर्षीय तरुणीवर चाकूने हल्ला झाला. विवाहित प्रियकर आणि दोन साथीदारांनी वार केले. तरुणी गंभीर जखमी असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Dhanshri Shintre

आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातील हिंजवडी परिसरात प्रेमसंबंधातून एका १८ वर्षीय तरुणीवर चाकू हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शनिवारी दुपारी ४.१५ च्या सुमारास साखरे वस्ती परिसरात घडलेल्या या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली आहे. सध्या रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी प्रियकर योगेश भालेराव, त्याचा मित्र प्रेम लक्ष्मण वाघमारे आणि एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे.

हिंजवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी योगेश भालेराव हे गेल्या काही महिन्यांपासून प्रेमसंबंधात होते. मात्र योगेश विवाहित असल्याचे नंतर समोर आले. त्याच्या पत्नीला या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर ती नवऱ्याला सोडून घराबाहेर पडली होती. या घटनेनंतर योगेशने संबंधित तरुणीवर लग्नासाठी दबाव टाकला होता. परंतु तिने त्यास नकार दिला.

यानंतर तरुणीचे दुसऱ्या युवकासोबत संबंध असल्याची माहिती समजताच योगेशला राग आला. संतापाच्या भरात त्याने शनिवारी दुपारी आपल्या दोन साथीदारांसह साखरे वस्ती परिसरात पोहोचून चाकूने तरुणीवर वार केले. हल्ल्यात तिच्या हातावर, तोंडावर आणि इतर शरीराच्या भागांवर गंभीर इजा झाली.

घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी जखमी तरुणीला तातडीने रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी सांगितले की तरुणीची प्रकृती सध्या स्थिर आहे आणि आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस आयुक्त कुन्हाडे आणि पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धक्कादायक! माजी मिस इंडियाचा घटस्फोट होणार? पतीवर मानसिक - शारीरिक छळाचा आरोप

Ethiopia Volcano Ash: सावधान! इथियोपिया ज्वालामुखीची राख भारतात, दिल्लीसह आणि राजस्थानात पसरलं विषारी धुकं

Maharashtra Live News Update : ज्यांच्या पाठीशी लाडक्या बहिणी त्यांच्या विजय पक्का - उपमुख्यमंत्री

Shocking: 'तू भारतीय नाही तर चिनी आहेस...', शांघाय विमानतळावर महिलेचा १८ तास छळ

12 हजार वर्षांनंतर ज्वालामुखीचा उद्रेक; राखेचे ढग दिल्ली-मुंबईत,कोणत्या विमानांच्या वेळांमध्ये बदल? VIDEO

SCROLL FOR NEXT