Pune Crime  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune: ...तर माझा मुलगा जिवंत असता, पुण्यामध्ये वर्गातच विद्यार्थ्याकडून मित्राची हत्या; हादरवून टाकणारे कारण समोर

10th Student killed in Classroom: पुण्यात दहावीच्या विद्यार्थ्याची वर्गात निर्घृण हत्या करण्यात आली. वर्गमित्रानेच या विद्यार्थ्यावर चाकूने पोटावर आणि गळ्यावर वार केले. या हल्ल्यात विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.

Priya More

Summary -

  • राजगुरूनगरमध्ये वर्गातच दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या

  • मित्रानेच चाकूहल्ला करून गळा चिरला

  • पूर्व वैमनस्यातून घेतला जीव

  • क्लास चालकांच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचा पालकांचा आरोप

रोहिदास गाडगे, पुणे

पुण्याच्या राजगुरूनगरमध्ये दहावीतील विद्यार्थ्याची वर्गातच हत्या करण्यात आली. खासगी कोचिंग क्लासेसमध्ये ही घटना घडली. मित्रानेच या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला करत त्याचा गळा चिरला. हल्ल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. पुष्कर शिंगाडे असं हत्या करण्यात आलेल्या मुलाचे नाव होते. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पुष्करचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रयाग मांजरे असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुष्कर शिंगाडे आणि प्रयाग मांजरे यांच्यामध्ये दोन दिवसांपूर्वी भांडण झाले होते. दोघांमध्ये किरकोळ कारणावरून हाणामारी झाली होती. या घटनेची माहिती क्लास चालकांनी पालकांना दिली नव्हती. तसंच हे भांडण होऊनही क्लास चालक आणि शिक्षकांनी कोणतिही खबरदारी घेतली नाही. उलट दोघांनाही एकाच बाकावर बसवलं गेलं आणि त्यातूनच हा भयानक हत्येचा प्रकार घडला.

मयत पुष्कर शिंगाडे यांच्या वडिलांनी संताप व्यक्त करत क्लास चालकांवर गंभीर आरोप केले. जर क्लास चालकांनी दोन दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाबद्दल आम्हाला सांगितलं असतं आणि सावध केलं असतं तर आज माझा मुलगा जिवंत असता. या घटनेनंतर खासगी क्लासेसमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या दोन्ही विद्यार्थ्यांमध्ये ३ महिन्यांपूर्वी भांडण झाले होते.

पुण्याचे डीवायएसपी अमोल मांडवे यांनी सांगितले की, या दोघांमध्ये ३ महिन्यांपूर्वी भांडण झालं होतं. त्याचवेळी पोलिसांना याबाबत कळवलं असतं. तर कदाचित ही घटना घडली नसती. हल्ला करणाऱ्या मुलाने गळ्यावर आणि पोटात चाकूने वार केले. शिकवणीमध्ये एका बँचवर बसलेले असताना ही धक्कादायक घटना घडली. आता हल्ला करणाऱ्या मुलाचा शोध सुरु आहे.' तसंच, 'पालकांनी या घटनेतून बोध घ्यायला हवा आणि स्वतःच्या मुलांसोबत योग्य ते संभाषण ठेवायला हवं. आपल्या मुलाचे मित्र कोण आहेत? ते फावल्या वेळेत काय करतात? कुठं बसतात? याची माहिती पालकांनी ठेवावी.', असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashmika Mandanna: 'पदरावर देवी, हातावर मेंहदी...'; रश्मिका मंदान्नाच्या मेहंदी समारंभाचे सुंदर फोटो व्हायरल

Health Care : उन्हाळ्यात दही खाल्याने काय होते? जाणून घ्या

Nashik Tourism : हजारो वर्षांचा इतिहास दडलाय 'या' किल्ल्यात, नाशिकमध्ये घ्या ट्रेकिंगचा अनोखा अनुभव

Blocked arteries: हृदयाच्या धमन्या ब्लॉक झाल्यावर हातामध्ये दिसतात ही लक्षणं; शरीरातील बदल वेळीच ओळखा

Shocking: बंद कारमध्ये आढळले दोघांचे मृतदेह अन् दारू, दार उघडताच पोलिसही चक्रावले; परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT