Pune Court Sentenced 3 Persons Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Court Sentenced 3 Persons: पुणे न्यायालयाने तिघांना सुनावली मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा, नेमकं काय आहे प्रकरण?

Pune Court: न्यायालयाने या आरोपींना शिक्षा सुनावत प्रत्येकी 25 हजारांचा दंड देखील ठोठावला आहे.

Priya More

Pune News: पुण्यामध्ये सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा (life imprisonment) सुनावण्यात आली आहे. पुणे न्यायालयाने (Pune Court) तीन आरोपींना ही जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने या आरोपींना शिक्षा सुनावत प्रत्येकी 25 हजारांचा दंड देखील ठोठावला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी नालासोपारा येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करुन तिची हत्या केली होती. हत्येनंतर या मुलीचा मृतदेह बॅगेत भरुन त्यांनी तळेगाव रेल्वे स्थानकावर टाकून दिला होता. या घटनेमुळे नालासोपारा हादरले होते. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली होती. ईशान कुरेशी, संतोष जोगदर आणि राहुल बरई अशी आरोपीची नावे आहेत.

हे तिन्ही आरोपी या प्रकरणात शिक्षा भोगत होते. याप्रकरणावर नुकताच पुणे विशेष न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करुन हत्या केल्याप्रकरणी मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. विशेष सरकारी वकील यांनी या प्रकरणात फाशीच्या शिक्षेची मागणी केली होती.

ईशान कुरेशी, संतोष जोगदर आणि राहुल बरई या तिन्ही आरोपींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अपहरणाचा कट रचल्या प्रकरणी 5 वर्षांची शिक्षा, सामूहिक बलात्कार प्रकरणी मरेपर्यंत जन्मठेप, हत्या केल्या प्रकरणात जन्मठेप आणि पुरावे नष्ट केल्याप्रकरणी 3 वर्षांची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. या शिक्षेसोबत न्यायालयाने त्यांना प्रत्येकी 25 हजारांचा दंड सुनावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pooja Sawant: पूजा सावंतचा गुलाबी साडीत खुलला मराठमोळा अंदाज; चाहत्यांच्या खिळल्या नजरा

Stylish Blouse Designs For Woman: साध्या साडीलाही मिळेल रिच लूक! ट्राय करा 5 हटके आणि ट्रेंडी ब्लाऊज पॅटर्न्स

UPI पेमेंट शुल्कावरून सर्वोच्च न्यायालय ॲक्शन मोडमध्ये; केंद्र सरकारसह RBI आणि NPCI ला नोटीस

Kidney Stones : तुम्हाला किडनी स्टोन झालाय? रोज खा 'ही' ४ हिरवी पाने

Maharashtra News Live Update: दुष्काळाच्या मागणीसाठी शेकडो शेतकरी तहसील कार्यालयावर धडकले; सोयाबीन जाळून निषेध

SCROLL FOR NEXT