Special 75 Rupee Coin: नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाला लॉन्च होणार 75 रुपयांचं खास नाणं, काय आहे या नाण्याचं वैशिष्ट्ये?

Finance Ministry Notification: अर्थमंत्रालयाने अधिसूचना जारी करत याबाबतची घोषणा केली आहे.
New Parliament Inauguration
New Parliament Inauguration Saam Tv

New Parliament Inauguration: देशाला लवकरच नवीन संसद भवन (New Parliament Building) मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते 28 मे रोजी नवीन संसद भवनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या सोहळ्यानिमित्त अर्थमंत्रालयाकडून (Ministry Of Finance) मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या उद्घाटनाच्या वेळी अर्थमंत्रालय 75 रुपयांचे विशेष नाणं लॉन्च करणार आहे. अर्थमंत्रालयाने अधिसूचना जारी करत याबाबतची घोषणा केली आहे. 75 रुपयांचे हे नाणं नेमकं कसं असणार आहे आणि त्याचे खास वैशिष्ट्य काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत...

New Parliament Inauguration
Hyderabad Customs Seized Gold: अन् त्यानं गुप्तांगात लपवून आणलं 42 लाखांचं सोनं, पण विमानतळावर पोहचताच कारनामा उघड

अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 75 रुपयांचे हे नाणं भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे (75 years of independence) पूर्ण झाल्याचे महत्त्व दर्शवणार आहे. या नाण्यावर रुपयाचे चिन्ह देखील असेल आणि अंकांमध्ये 75 लिहिलेले असेल. या 75 रुपयांच्या नाण्याच्या एका बाजूला अशोक स्तंभाचा सिंह असेल. त्याखाली 'सत्यमेव जयते' असे लिहिलेले असेल. त्यात डावीकडे देवनागरी लिपीत 'भारत' आणि उजवीकडे इंग्रजीत 'इंडिया' लिहिलेले असेल. 75 रुपयांचे हे नाणं 44 मिमी व्यासाचे गोलाकार असेल.

अर्थ मंत्रालयाने सांगितल्याप्रमाणे, या नाण्यावर संसदेच्या नवीन इमारतीची देखील प्रतिमा असेल. संसद भवनच्या वरच्या बाजूला हिंदीत 'संसद संकुल' आणि खालच्या बाजून इंग्रजीमध्ये 'Parliament Complex' लिहिलेलं असेल. 75 रुपयांचे हे नाणं चार धातूंपासून तायर केलेले असेल. त्यात 50 टक्के चांदी, 40 टक्के तांबे, 5 टक्के निकेल आणि 5 टक्के झिंक असेल.

75 रुपयांच्या या नाण्याचे वजन 35 ग्रॅम असेल. हे नाणं भारत सरकारच्या कोलकाता टांकसाळीत तयार करण्यात आले आहे. या नाण्यावरील संसद परिसराच्या प्रतिमेच्या खाली '2023' हे वर्ष कोरले जाईल. या नाण्याची रचना राज्यघटनेच्या पहिल्या अनुसूचीमध्ये दिलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार असेल. या नाण्याची रचना खूपच खास पद्धतीने करण्यात आली आहे.

New Parliament Inauguration
Love Affair Crime: प्रेमाचा भयानक अंत! जीवापाड प्रेम करणाऱ्या प्रियकराला महिला पोलिसाने संपवलं

नवीन संसद भवनाचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटनाच्या समारंभाला 25 पक्ष सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर 20 विरोधी पक्षांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. सत्ताधारी एनडीएच्या 18 सदस्यांव्यतिरिक्त भाजपसह सात बिगर एनडीए पक्ष या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. बसपा, शिरोमणी अकाली दल, जनता दल (धर्मनिरपेक्ष), लोक जनशक्ती पार्टी (रामविलास), वायएसआर काँग्रेस, बीजेडी आणि टीडीपी हे पक्ष कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com