CCTV Footage : आधी घेरलं, मग गाडीत बसवलं; अबू सालेमच्या भाच्याचे अपहरण झाल्याचा संशय, पण...

CCTV Footage : साध्या कपड्यांमध्ये आलेल्या 4-5 जणांनी आरिफला गाडीत बसवून नेले.
Mumb ai News
Mumb ai NewsSaam TV

संजय गडदे

Mumbai News : कुख्यात गुंड अबू सालेम यांच्या भाच्याचे काल रात्री वांद्रे येथून अपहरण झाल्याचा संशय त्याच्या नातेवाईकांनी व्यक्त केला.

सालेम याचा भाचा आरिफ काल रात्री वांद्रे हील रोड परिसरात पान टपरी समोर उभा असताना 4-5 जणांनी त्याला घेरलं आणि गाडीत नेऊन बसवलं. तेव्हापासून तो गायब होता. या घटनेचं सीसीटीव्ही फूटेच समोर आलं आहे.

साध्या कपड्यांमध्ये आलेल्या 4-5 जणांनी आरिफला गाडीत बसवून नेले. मात्र पोलीस ते पोलील होते की आणखी कोण होते याचा अंदाज कुणालाच येत नव्हता. याबाबत अधिक माहिती मिळत नसल्याने कुटुंबियांना याविषयी वांद्रे पोलीस ठाण्यात अपहरणाच्या दृष्टीने तपास सुरू केला. (Latest Marathi News)

Mumb ai News
Pune News: पुणेकरांनो सावधान! नो पार्किंगमध्ये वाहन लावाल तर खिसा होईल रिकामा; किती होणार दंड?

आरिफला उत्तर प्रदेशच्या आझमगड पोलिसांनी एका गुन्ह्याप्रकरणी अटक केली, असल्याची माहिती पुढे आली आहे.आरिफ विरोधात उत्तर प्रदेश आजमगड येथे एक गुन्हा दाखल झाला होता.

या गुन्ह्याच्या तपासाप्रकरणी आझमगड पोलिसांनी ही गुप्त कारवाई करून आरिफला ताब्यात घेतले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com