pune news  Saam tv
मुंबई/पुणे

Pune News : पुण्यात निर्माणाधीन बांधकामाच्या ढिगाऱ्याखाली ३ कामगार अडकले; एकाचा मृत्यू

Pune Latest news : पुण्यात निर्माणाधीन बांधकामाच्या ढिगाऱ्याखाली ३ कामगार अडकल्याची घटना घडलीये. या घटनेनंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आहेत.

Vishal Gangurde

बांधकामाच्या ढिगाऱ्याखाली ३ कामगार अकडकले

महापालिकेच्या ड्रेनेज लाइनचं कामादरम्यान घडली दुर्घटना

दुर्घटनेत एका कामगाराचा मृत्यू झालाय

सचिन जाधव, साम टीव्ही

Pune : पुण्यात निर्माणाधीन बांधकामाच्या ढिगाऱ्याखाली ३ कामगार अडकल्याची घटना घडली आहे. पुण्यातील सिंहगड रोड, नांदेड सिटीमध्ये बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी ढिगाऱ्याखाळी ३ कामगार अडकले आहेत. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आहेत. या घटनेने इतर कामगारांमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील नांदेड सिटीमध्ये एका ठिकाणी काम सुरु असताना ३ कामगार मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच पुणे आणि पीएमआरडीएचे अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. तसेच पीडीआरएफचे जवान देखील घटनास्थळी पोहोचले.

पुणे महानगरपालिकेच्या ड्रेनेज लाइनचं काम सुरु असताना ही दुर्दैवी घटना घडली. या कामगारांचे तोंड वर आहे. तर त्यांचं शरीर मातीत अडकलं आहे. या कामगारांना अग्निशमन स्थानिक प्रशासनाच्या मदतीने बाहेर काढण्याचे काम सुरू आहेत. या घटनेत आतापर्यंत एका कामगाराला रेस्क्यू करून बाहेर काढलं आहे. तर दोघांना बाहेर काढण्याचं काम सुरु आहे.

एका कामगाराचा मृत्यू

नांदेड सिटी कंपाऊंड वॉलच्या बाहेरील बाजूस ही घटना घडली. या भागातील ड्रेनेज लाइनचं कामादरम्यान घडलेल्या दुर्घटनेत दोन कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं आहे. तर एका कामगाराच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एका कामगाराच्या मृत्यूने त्याच्या सहकाऱ्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime : भयानक! १९ वर्षांच्या पत्नीला हेल्मेटनं ठेचून मारलं, लग्नानंतर ४ महिन्यात नेमकं काय झालं?

शिंदेसेनेनंतर भाजप नगरसेवकाची गुंडगिरी, महाडच्या मुख्याधिकाऱ्यांना छत्रीनं मारहाण, अटकेचा फार्स आणि कायद्याचे धिंडवडे

Shahi Tukda Recipe: गोड खाण्याची इच्छा होते? मग झटपट घरच्या घरी बनवा स्वादिष्ट शाही तुकडा

Maharashtra News Live Update: खेडमध्ये अतिवृष्टीचा हाहाकार; तिघांचा मृत्यू, एक जण बेपत्ता

Sanju Samson : भारत-इंग्लंड मालिकेदरम्यान संजू सॅमसनचा मोठा निर्णय; अचानक स्पर्धेतून नाव घेतलं मागे; सर्वांनाच आश्चर्याचा धक्का

SCROLL FOR NEXT