Datta Bahirat Meets Ajit Pawar  Saam Tv News
मुंबई/पुणे

Pune Congress : पुण्यात काँग्रेसला पुन्हा धक्का बसण्याची शक्यता, शिवाजीनगरमध्ये वर्चस्व असलेल्या बड्या नेत्याची अजितदादांसोबत भेट

Datta Bahirat Meets Ajit Pawar : दत्ता बहिरट हे पुण्याचे काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक आहेत. बहिरट यांनी २०१९ आणि २०२४ साली काँग्रेसकडून शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवली होती.

Prashant Patil

पुणे : पुण्यात काँग्रेसला आणखी एक धक्का बसण्याची दाट शक्यता आहे. पुण्याचे काँग्रेसचे नेते दत्ता बहिरट यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांची पुण्यात भेट घेत त्यांनी चर्चा केली आहे. अजित पवारांच्या भेटीनंतर बहिरट राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचा चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत.

दत्ता बहिरट हे पुण्याचे काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक आहेत. बहिरट यांनी २०१९ आणि २०२४ साली काँग्रेसकडून शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवली होती. पण ते निवडून आले नाहीत. मात्र, दत्ता बहिरट यांचं शिवाजीनगर मतदार संघामध्ये मोठं वर्चस्व आहे. त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर राजकीय तोटा होऊ शकतो.

या सर्व घडामोडींवर दत्ता बहिरट म्हणाले की, 'माझ्या नातेवाईकांच्या घरी अजितदादा आले होते. तेव्हा मला जेवण्याचं निमंत्रण होतं, तिथे मी गेलो होतो, तिथेच अजित दादांची भेट झाली. मात्र, पक्ष प्रवेशाबाबत अद्याप तरी काही निर्णय झालेला नाही.'

गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यात काँग्रेसला मोठी गळती लागली आहे. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. रवींद्र धंगेकर यांच्यानंतर काँग्रेसचे बडे आणि जेष्ठ नेते दत्ता बहिरट यांनी अजित पवार यांची भेट घेतल्यामुळे काँग्रेसला पुण्यामध्ये आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navratri Remedies: नवरात्रीत सुपारीच्या पानांचा करा खास उपाय, मिळेल नोकरी व व्यवसायात यश

Today Gold Rate: नवरात्रीत सोन्याला पुन्हा झळाली; १० तोळ्यामागे ३००० रुपयांची वाढ; वाचा आजचे दर

Bigg Boss 19: नेहलची री-एन्ट्री, तान्याची पोलखोल, फरहाना - गौरवची कॅप्टनशिपसाठी भांडण; काय घडलं बिग बॉसच्या घरात

GK: एक ट्रेन चालवण्यासाठी किती खर्च येतो? जाणून घ्या सर्व माहिती

Maharashtra News : दिवाळीसाठी एसटीच्या ९०० विशेष फेऱ्या, कुठून किती बस धावणार?

SCROLL FOR NEXT