Pune Crime Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime : पुण्यातील कॉलेजबाहेर तुफान राडा! टोळक्याकडून विद्यार्थीला बेदम मारहाण, वासा डोक्यात मारला अन्...

Pune News : पुण्यातील लष्कर परिसरात महाविद्यालयीन तरुणांमध्ये तुफान राडा झाला. निकालाच्या यादीमध्ये नाव शोधताना विद्यार्थ्यांमध्ये बाचाबाची झाली. धक्का लागल्याच्या कारणातून टोळक्याने एका विद्यार्थ्याला मारहाण केली.

Yash Shirke

सागर आव्हाड, साम टीव्ही, प्रतिनिधी

पुण्यातील कॉलेजच्या बाहेर विद्यार्थ्यांच्या टोळक्याने एकाला मारहाण केली. धक्का लागल्याच्या कारणावरुन १० ते १५ विद्यार्थ्यांनी एका विद्यार्थ्याला मारहाण केली. टोकळ्यातील मुलांनी पीडित विद्यार्थ्याच्या डोक्यात वासा मारला. वृद्धाने मध्यस्थी केल्याने विद्यार्थ्याचे प्राण वाचले. या प्रकरणी पुण्यातील लष्कर पोलीस ठाण्यात विद्यार्थ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांमधील राड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, किरकोळ कारणावरून पुण्यातील एका कॉलेज बाहेर विद्यार्थ्यांमध्ये तुफान राडा झाला. दहा-पंधरा विद्यार्थ्यांच्या टोळक्याने मिळून एका विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला केला. हा प्रकार पुण्यातील लष्कर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने एका विद्यार्थ्याच्या डोक्यात वासा घालून त्याला गंभीर जखमी केलाय. दरम्यान या विद्यार्थ्यावर सध्या केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी इरफान मोहम्मद हुसेन कर्नुल, यांनी फिर्याद दाखल केली असून ते या जखमी विद्यार्थ्यांचे मामा आहेत. पुण्यातील लष्कर परिसरात असलेल्या एका नामांकित कॉलेजमध्ये नुकत्याच झालेल्या परीक्षांचा निकाल जाहीर करण्यात आला होता‌. या निकालाच्या यादीत नाव शोधण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी झाली होती. याच गर्दीत एका विद्यार्थ्याचा इतर काही विद्यार्थ्यांना धक्का लागला. केवळ धक्का लागण्याच्या कारणावरून दहा ते पंधरा विद्यार्थ्यांनी मिळून त्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली.

आरोपी विद्यार्थ्यांनी त्याच्या डोक्यात मोठा लाकडी वासा घातला. मारहाणीत हा विद्यार्थी रक्तबंबाळ झाल्यानंतरही हे विद्यार्थी त्याला मारहाण करत राहिले. त्यावेळी एका वृद्धानं या सगळ्यांना हटकलं आणि या विद्यार्थ्यांच्या हातातून वासा हिसकावून घेतला. त्यामुळे या विद्यार्थ्याचे प्राण वाचले. या गंभीर परिस्थितीतही विद्यार्थ्याने प्रसंगावधान दाखवत त्याच्या मामाला फोन करून घडलेली घटना सांगितली. त्यावेळी मामाने घटनास्थळीत धाव घेत भाच्याला केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. त्याच्यावर सध्या आयसीयूमध्ये उपचार सुरू असून आरोपी विद्यार्थ्यांना विरोधात लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या मारहाणीचा खळबळ जनक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT