pune citizens stolen tiffin boxes pimpri chinchwad accident news saam tv
मुंबई/पुणे

Pimpri Chinchwad : ट्रकमधून खचाखच भरलेला माल रस्त्यावर पडला, मदत करायची सोडून पुणेकरांनी बॉक्सच पळवले

गोपाल मोटघरे

Pimpri Chinchwad :

पिंपरी चिंचवड शहरातून जाणाऱ्या ग्रेड सेप्रेटर रस्त्यावर एका ट्रकमध्ये खचाखच भरलेले शेकडाे टिफीन बॉक्स रस्त्यावर पडले. या घटनेची माहिती कळताच क्षणार्धात नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत टिफीन बाॅक्सवर हात मारला. (Maharashtra News)

पिंपरी चिंचवड शहरातून पुण्याला जाणाऱ्या ग्रेड सेप्रेटरमध्ये एका ट्रकमधून आज (साेमवार) सकाळी अचानक काही बाॅक्स रस्त्यावर पडले. तरीही चालकास बाब लक्षात आली नाही. त्याने ट्रक पुढे नेला. काही वाहन चालकांनी ट्रक चालकास बाॅक्स रस्त्यावर पडल्याचे सांगितल्यानंतर त्याने ट्रक थांबविला.

ताेपर्यंत नागरिकांनी बाॅक्स पळवून नेण्यास सुरुवात केली हाेती. हा प्रकार चालकाच्या लक्षात आल्यानंतर त्याने नागरिकांना थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांनी कारमध्ये, वाहनात, हातात बसतील तेवढे बाॅक्स पळवून नेले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या घटनेमुळे ग्रेड सेप्रेटर मधून पुण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली. या घटनेची माहिती पाेलिसांना समजल्यानंतर त्यांनी वाहतुक सुरळीत करण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2025 Rules: चुकीला माफी नाही..IPL मध्ये ही चूक केल्यास थेट 2 वर्षांचा बॅन

Crime News : कोचिंग सेंटर चालवणाऱ्या तीन भावांकडून विद्यार्थीनीवर अत्याचार; मुंबईमधील खळबळजनक घटना

Stress Free होण्यासाठी 'या' पदार्थांचे सेवन करा...

Sharad Pawar News: रोहित पवार भावी मुख्यमंत्री? शरद पवारांचे सर्वात मोठे विधान; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Viral News: असलं धाडस नको! पुराच्या पाण्यात दुचाकी टाकणं अंगलट; तरुण वाहून जातानाचा थरार मोबाइल कॅमेऱ्यात कैद

SCROLL FOR NEXT