Pune Police arrest theft Saam TV Marathi
मुंबई/पुणे

पुणे पोलिसांची कमाल! चोरी करून गायब झालेल्या चोरांना नेमके 'कुठे' गाठले? उत्तर ऐकून हसू आवरणार नाही

Pune Police latest news : पुण्यातील प्रसिद्ध मिठाई दुकानात चोरी करून फरार झालेल्या दोन आरोपींना बाणेर पोलिसांनी अटक केली. तब्बल 225 सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा शोध घेण्यात आला. अंघोळीसाठी घरी आल्यावर पोलिसांनी त्यांना जेरबंद केले.

Akshay Badve

Pune Police arrest theft suspects in Baner sweet : पुण्यातील प्रसिद्ध मिठाईच्या दुकानात चोरी करणाऱ्या आरोपींना पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. चोरी करून चोर पसार झाले होते, मात्र अंघोळीला घरी आल्यावर पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या. बाणेर पोलिसांनी तपासले तब्बल २२५ सी सी टिव्ही तपासले. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी दोघेही चोर संपूर्ण पुणे शहरात फिरायचे.

शिवम दत्ता अवचार (वय १९) आणि करण शिवाजी जमादार (वय १९) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. आरोपांकडून दोन महागड्या, एक महागडा मोबाईल दुचाकी, २ लोखंडी पालघन, १२ हजार रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ एप्रिल रोजी पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास अज्ञात इसमांनी बाणेर भागात चितळे बंधु व काका हलवाई या प्रसिद्ध मिठाईच्या दुकानात चोरी केली. दुकानाचे शटर हत्यारांच्या सहाय्याने उचकटून आत प्रवेश करुन लॉकरमध्ये देवपुजेसाठी सोने व चांदीचे ऐवज व रोख रक्कम असा ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल त्यांनी चोरून नेला. या प्रकरणी बाणेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांना गुंगारा देण्यासाठी हे दोघे ही जणं चोरी केलेल्या दिवशी त्यांच्याकडे असलेल्या स्पोर्ट्सबाईक वरून शहरभर फिरले. पुण्यातील शिवाजीनगर, घोरपडी, हडपसर, रामटेकडी, आळंदी, नऱ्हे, आंबेगाव अशा अनेक ठिकाणी या दोघांनी फेरफटका मारला. बाणेर पोलिसांनी शहरातील तब्बल २२५ पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर त्यांच्या दुचाकीची माहिती मिळवून त्यांचा राहत्या घराचा पत्ता मिळवला.

मात्र चोरी झाल्यापासून हे दोघं ही जणं घरी खूप कमी वेळा आले. यातील एक आरोपी घरी अंघोळीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून यातील एकाला ताब्यात घेतलं आणि त्यानंतर त्याच्या मदतीने दुसऱ्या साथीदाराला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलं. हे दोघे ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fashion Tips For Women: ब्लाऊजशिवाय साडी नेसण्याच्या मॉडर्न स्टाईल; 5 हटके आणि स्टायलिश पॅटर्न्स

मला प्रचंड त्रास दिला जातोय, आता संयमाचा बांध तुटणार; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

Maharashtra News Live Update: महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पीक नुकसान पाहणी

रशियाचा युक्रेनमधील भारतीय औषध कंपनीवर हल्ला; 400 कोटी रुपयांचं नुकसान

Maharashtra Fort : घनदाट जंगलात ३२०० फूट उंचीवर वसलाय 'हा' ऐतिहासिक किल्ला, ट्रेकिंगसाठी नक्की जा

SCROLL FOR NEXT