Rahul kalate Saam TV
मुंबई/पुणे

Chinchwad By-Election : उमेदवारी मागे घेण्याबाबत राहुल कलाटे म्हणाले, उद्धव ठाकरेंचा अनादर करायचा नाही, पण...

मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करतो. कारण त्यांनी आजपर्यंत मला पाठबळ दिलंय.

साम टिव्ही ब्युरो

Chinchwad News: शिवसेनेचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घ्यावा यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांची भेट आधीच घेतली होती. मात्र ते अपयशी ठरल्यानंतर आज शिवसेनेच्या सचिन अहिर यांनी राहुल कलाटे यांची मनधरणी केली आहे.

सचिन अहिर यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर राहुल कलाटे यांनी माध्यमांशी संवाद साधत कार्यकर्त्यांशी चर्चा करुन निर्णय घेणार असल्याचं म्हटलं आहे. अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने कलाटेंच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

राहुल कलाटे काय म्हणाले?

सचिन आहिर आणि माझी सविस्तर चर्चा झाली. चर्चेदरम्यान सचिन भाऊंनी उद्धव साहेबांशी देखील बोलणं करुन दिलं. साहेबांशी देखील चर्चा झाली आहे. उद्धव साहेबांचा कुठल्याही प्रकारचा अनादर करण्याचा माझा प्रयत्न नाही. परंतु आधी मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करतो. कारण त्यांनी आजपर्यंत मला पाठबळ दिलंय. त्यानंतर मी माझा निर्णय कळवतो, असं राहुल कलाटे यांनी म्हटलं आहे.

ठाकरे गटाचे नेते आणि पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा निरोप घेऊन राहुल कलाटे यांची भेट घेतली. दरम्यान आज चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असून एकूण 33 उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी आज शेवटच्या दिवशी कोण कोण आपले अर्ज माघारी घेतायत याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे. (Pune Election)

राहुल कलाटे हे निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याची माहिती मिळत आहे. त्यानुसार कलाटे यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवल्यास चिंचवड पोटनिवडणुकीत तिरंगी लढत होईल. मात्र या तिरंगी लढतीमुळे मतांच विभाजन होऊन त्याचा थेट फायदा भाजपच्या उमेदवारास होऊ शकतो, असं मत राजकीय विश्लेषकाकडून व्यक्त केलं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope: वाणीवर लक्ष द्या, पैशाचं टेन्शन कमी होईल; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

Arvind Kejriwal : आमचं सरकार आलं तर ५ दिवसांत E20 पेट्रोलवर बंदी; केजरीवाल यांची मोठी घोषणा

CJP New Team: कॉक्रोच जनता पार्टीमध्ये मोठा फेरबदल, नवीन सदस्यांची नियुक्ती, कुणाला मिळाली संधी?

Mysterious Fort : रहस्यांनी भरलेला प्राचीन किल्ला, 'या' गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील

SCROLL FOR NEXT