Pune x
मुंबई/पुणे

Pune : छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या दारूड्या तरुणाला अटक, पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई

Pune News : एकाने दारुच्या नशेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केली होती. या घटनेनंतर आरोपी पाच दिवस उसाच्या शेतात लपून बसला होता. पोलिसांनी आरोपीला शेतातून अटक केली.

Yash Shirke

  • दारुच्या नशेमध्ये एकाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केली.

  • या प्रकारानंतर आरोपी तब्बल पाच दिवस शेतात लपून बसला होता.

  • ऊस खाऊन आणि घोड्यांना जे पाणी दिलं जात ते पाणी पिऊन तो लपून बसला होता.

  • पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपीला शेतातून अटक केली.

अक्षय बडवे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Pune Shocking : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या तरुणाला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. हा तरुण उसाच्या शेतात लपून बसला होता. ऊस खाऊन आणि घोड्यांना दिले जाणारे पाणी पिऊन तो ५ दिवस शेतात लपला होता. पोलिसांनी या तरुणाच्या मुसक्या आवळल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील दौंड तालुक्यातील यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत नीलकंठेश्वर मंदिर आहे. या मंदिराच्या गाभाऱ्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनावर बसलेला एक प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुतळा आहे. २७ जुलै रोजी सकाळी ७ च्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करत शिवरायांच्या पुतळ्याचे नुकसान केले होते.

या घटनेची माहिती मिळताच यवत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या तरुणाला शोधण्यासाठी यवत पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तयार करण्यात आले. तपास सुरु असताना आज (३१ जुलै) संबंधित तरुण यवतमधील एका ऊसाच्या शेतात लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या ठिकाणी जाऊन पोलिसांच्या पथकाने आरोपीला ताब्यात घेतले.

दारूच्या नशेमध्ये त्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केली होती. पोलिसांनी मुसक्या आवळल्यानंतर आरोपीने केलेल्या कृत्याची कबुली दिली. या प्रकरणाचा अधिकचा तपास सुरु असल्याचे यवत पोलिसांनी म्हटले आहे. या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

ठेकेदारासाठी आमदाराची आयुक्तांना धमकी? कोट्यवधींच्या कामासाठी आमदाराला हवा मर्जीतला ठेकेदार?

Mumbai Accident : मुंबईच्या पॉश एरियात भीषण अपघात, भरधाव कारने तिघांना उडवले, पत्नीच्या डोळ्यासमोर पतीचा मृत्यू

Maharashtra Politics: राज ठाकरे इंडिया आघाडीत येणार? राज्यात नवं राजकीय समीकरण?

SCROLL FOR NEXT