Pune Crime Saam Tv News
मुंबई/पुणे

Pune News: पुणेकरांनो सावधान! वॉकला जाताय? दीड महिन्यात शहरात धक्कादायक घटना, ज्येष्ठ महिलांना जास्त धोका...

Chain Snatching During Morning Walk: पुणेकरांनो सकाळी मॉर्निंग वॉक किंवा सायंकाळी शतपावली करताय? तर सावधान. कारण पुण्यात चोरट्यांचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे.

Bhagyashree Kamble

पुणेकरांनो सकाळी मॉर्निंग वॉक किंवा सायंकाळी शतपावली करताय? तर सावधान. कारण पुण्यात चोरट्यांचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे. दुचाकीवरून येणारे चोरटे प्रामुख्यानं ज्येष्ठ महिलांना लक्ष करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी चोरून पसार होत आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ३ लाख १२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

पुण्यात सध्या चोरट्यांचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे. दुचाकीवरून चोरटे येतात. नंतर प्रामुख्यानं ज्येष्ठ महिलांच्या गळ्यातील सोन्याची साखळी चोरतात. मॉर्निंग वॉक किंवा शतपावली करणाऱ्या लोकांनाच चोरटे टार्गेट करत आहेत. यामुळे पुणेकरांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झालं आहे.

नव्या वर्षाच्या पहिल्या दीड महिन्यात शहरात जबरी चोरीच्या घटना घडल्या आहेत. आतापर्यंत २१ हून अधिक घटना घडल्या असून, दुचाकीस्वार चोरट्यांना रोखण्याच्या आव्हान पुणे पोलिसांसमोर उभे होते. २१ पैकी नऊ गुन्हे उघडकीस आले आहेत. तसेच इतर गुन्ह्यांचा तपास पोलीस करीत आहेत.

२१ चोरीच्या घटनांमध्ये २० लाख ६ हजार ५०० रक्कम चोरीला गेली आहे. यापैकी पोलिसांनी तीन लाख १२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्यामुळे पुणेकरांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ९ गुन्हे उघडकीस आल्यानंतर आणखी १२ गुन्ह्यांचा तपास पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली; बॉलीवूड भीतीच्या छायेत

Gokul Election Result: गोकुळच्या निवडणुकीत महाडिक कुटुंबाला धक्का! शौमिका महाडिकांचा दारूण पराभव

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घ्यावे लागणार? ९२ हजार अपात्र लाभार्थ्यांमुळे खळबळ

MLC Election: पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी कधी होणार मतदान, ५ जागांसाठी किती उमेदवार रिंगणात? जाणून घ्या महत्त्वाच्या बाबी

Night Owl Risks : रात्री उशिरा झोपण्याची सवय ठरतेय आरोग्यासाठी घातक; शरीरावर होतात हे गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT