Pune Bus Fire Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Bus Fire: पिरंगुट घाटात भीषण अग्नितांडव! धावती बस पेटली, जळून झाला कोळसा

Bus Catches Fire In Pirangut Ghat: पिरंगुट घाटात भीषण अग्नितांडव पाहायला मिळालं आहे. काल रात्री पिरंगुट घाटात धावत्या बसने पेट घेतला आहे. या घटनेत बसचा जळून कोळसा झाला आहे.

Rohini Gudaghe

अक्षय बडवे साम टीव्ही, पुणे

पुण्यातील पिरंगुट घाटात भीषण अग्नितांडव पाहायला मिळालं आहे. काल रात्री पिरंगुट घाटात धावत्या बसने पेट घेतला (Bus Catches Fire In Pirangut Ghat) आहे. या घटनेत बसचा जळून कोळसा झाला आहे. बस पेटल्यामुळे प्रवाशांमध्ये भितीचं वातावरण होतं. चालकाने प्रसंगावधान बाळगल्याने मोठी हानी टळल्याचं सांगिलतं जात आहे. पिरंगुट घाटात ही घटना घडली आहे.

पुण्यातील पिरंगुट घाटात धावत्या बसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आगीत संपूर्ण बस जळून खाक झाली आहे. काल रात्री १० वाजता ही घटना घडली आहे. पिरंगुट घात उतरताना बसमधून धूर येत (Pune Bus Fire) होता. हे लक्षात येताच चालकाने बस थांबवली. पुण्यातील पिरंगुट घाटात हा भीषण अपघात झाला आहे. बस चालकाने सावधगिरी बाळगल्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

बसमधील सर्व नागरिकांना खाली उतरवले. मात्र, त्यानंतर बसने वेगात पेट घेतला. अग्निशमन दलाची गाडी येईपर्यंत संपूर्ण बस जळून खाक झाली होती. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली (Bus Fire News) नाही. परंतु बसला आग लागल्यामुळे सर्व प्रवाशी गोंधळलेल्या अवस्थेत होते. ते मदतीसाठी आरडाओरड करत होते. बस नेमकी कशामुळे पेटली, याचं कारण अजून समोर आलेलं नाही.

पिरंगुट येथून पुणे शहराकडे निघालेल्या बसला मुळशी तालुक्यातील पिरंगुट घाटातील (Pirangut Ghat) जिप्सी हॉटेलजवळ रात्री १० वाजता आग लागली. या आगीच्या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. परंतु बसचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संपूर्ण बस जळून गेलेली आहे. पिरंगुट घाटात बसला आग लागल्याचा थरार पाहायला मिळाला आहे. रस्त्यावरच बस पेटल्यामुळे इतर वाहनांना देखील काही काळ अडथळा निर्माण झाला होता. रस्त्यावर प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याचं यावेळी पाहायला मिळालं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT