SCHOOL BUS AND VAN FEES HIKE BY 25 PERCENT DUE TO RISING FUEL PRICES AI
मुंबई/पुणे

Bus Fare Hike : दिवाळीनंतर खासगी बस अन् स्कूल बसच्या भाड्यात प्रचंड वाढ, किती वाढणार दर?

Pune Bus Fare Hike : दिवाळीनंतर पुण्यात खासगी बस आणि स्कूल बसच्या भाड्यात २० ते २५ टक्के वाढ प्रस्तावित आहे. डिझेल, टायर आणि देखभाल खर्चामुळे घेतलेल्या निर्णयानुसार १७ ते ४९ सीटर बसचे जुने आणि नवीन किलोमीटरनुसार दर जाणून घ्या.

Namdeo Kumbhar

सागर आव्हाड, पुणे प्रतिनिधी

Pune private bus fare hike after Diwali : डिझेल, टायर, बॅटरी आणि स्पेअर पार्ट्सच्या भडकलेल्या दरांमुळे स्कूल बस आणि खासगी बसचा प्रवास आता महागणार आहे. वाहनांच्या देखभाल-दुरुस्तीचा खर्च प्रचंड वाढल्यामुळे पुणे बस अँड कार ओनर्स असोसिएशनने प्रवासी वाहतूक दरात २० ते २५ टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील ५ वर्षांत बस वाहतूक दरामध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नव्हती. मात्र आता हा निर्णय घेणे अपरिहार्य असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.

१४०० हून अधिक सभासद असलेली महत्त्वाची संघटना

पुणे बस अँड कार ओनर्स असोसिएशन ही पुणे शहरातील एक प्रमुख संघटना आहे. यात सुमारे १४०० सभासद कार्यरत आहेत. या संघटनेच्या माध्यमातून प्रासंगिक करारावर (Contract Carriage) चालणाऱ्या प्रवासी बसेस, शैक्षणिक सहली, लग्न समारंभ, धार्मिक यात्रा, शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बसेस तसेच पुणे आणि परिसरातील विविध कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांची ने-आण करणाऱ्या स्टाफ बसेस चालवल्या जातात.

दरवाढीची नेमकी कारणे काय?

मागील पाच वर्षांत वाहनांच्या किमती, टायर्स, स्पेअर पार्ट्स, चालकांचे वेतन, विमा, इंधन आणि विविध शासकीय कर यामध्ये भरमसाठ वाढ झाली आहे. याविषयी माहिती देताना पुणे बस अँड कार ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष राजन जुनवणे यांनी सांगितले की, "मिनी बस आणि टेम्पो ट्रॅव्हलरसह सर्वच बस गाड्यांच्या किमतीत जवळपास दुपटीने वाढ झाली आहे. टायर्सचे दर दीडपट, तर इंजिन ऑइलचे दर ७० ते ८० टक्क्यांनी वाढले आहेत. तसेच ॲडब्लू (AdBlue) चा खर्च नव्याने जोडला गेला आहे. स्पेअर पार्ट्स, बॅटरी, चालकांचे पगार, भत्ते, आरटीओ पासिंग-फिटनेस चार्जेस, विमा आणि शासकीय ई-चलनामध्येही मोठी वाढ झाली आहे. या वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर व्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी ही दरवाढ करणे क्रमप्राप्त होते."

कोणत्या गाड्यांच्या भाड्यात होणार वाढ?

या दरवाढीमध्ये १३ सीटरपासून ते ४९ सीटरपर्यंतच्या सर्वच बसेसचा समावेश असणार आहे. स्कूल बसेस (शालेय वाहतूक), स्टाफ बसेस (कंपनी कर्मचारी वाहतूक), टुरिस्ट आणि ट्रॅव्हल बसेस, प्रासंगिक व धार्मिक यात्रेच्या बसेस मागील काही वर्षांपासून महागाईचा सामना करत असलेल्या बस मालकांना या दरवाढीमुळे काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र दुसरीकडे या दरवाढीचा थेट फटका सर्वसामान्य प्रवासी, पालक आणि कंपन्यांच्या बजेटवर बसणार आहे.

प्रस्तावित बस भाडेवाढ (किमीप्रमाणे)

बस/गाडीचा प्रकार - जुना दर नवीन दर

१७ सीटर - २३ रुपये - २७ रुपये

२० सीटर - २५ रुपये - ३० रुपये

३२ सीटर - ३३ रुपये - ३८ रुपये

३५ सीटर - ३६ रुपये - ४२ रुपये

४० सीटर - ४१ रुपये - ४५ रुपये

४५ सीटर - ४५ रुपये - ५५ रुपये

४९ सीटर - ४५ रुपये - ५५ रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हातात बेड्या, आता अंगावर खाकी! जेलमध्ये राहून MPPSC परीक्षा दिली; थेट DSP पदाला गवसणी

IND vs NZ 1st T20I Today Cricket : पहिल्या टी २० मध्ये टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय; नमन- संजू ठरले विजयाचे शिल्पकार

Election: पदवीधर निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांचा दणका; दिग्गज नेत्याची थेट ६ वर्षांसाठी पक्षातून हाकालपट्टी

Maharashtra News Live Update: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातील अनिल पंडित फरार घोषित

Diljit Dosanjh: मोठी बातमी! दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टला पोलिसांचा स्पष्ट नकार, परवानगी नाकारताना सांगितली ३ कारणं

SCROLL FOR NEXT