Pune Shivshahi Bus Fire
Pune Shivshahi Bus Fire  SAAM Tv
मुंबई/पुणे

Pune Bus Fire : मोठा अनर्थ टळला! ४२ प्रवासी घेऊन निघालेली शिवशाही बस पेटली, थरारक VIDEO पाहा

साम न्यूज नेटवर्क

ज्ञानेश्वर हिंगोलीकर

पुणे : खासगी बसला आग लागून प्रवाशांचा बळी गेल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली असतानाच, पुण्यातील येरवड्यातही भररस्त्यात शिवशाही बस पेटली. या बसमधून ४२ प्रवासी प्रवास करत होते. सुदैवाने सर्व ४२ प्रवासी खाली उतरल्यानंतर ही आग लागल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.

पुण्यातील येरवडा येथील शास्त्री चौकात ही घटना घडली. यवतमाळ-चिंचवड शिवशाही बसने भररस्त्यात पेट घेतला. बस नादुरुस्त झाल्याने चालकाने ती रस्त्याच्या बाजूला थांबवली. त्यानंतर बसमधील सर्व ४२ प्रवाशांना खाली उतरवले. काही वेळातच या बसने पेट घेतला. बसमधून आगीच्या ज्वाळा दूरपर्यंत निघत होत्या. (Breaking News Marathi)

दैव बलवत्तर म्हणून...

यवतमाळ - चिंचवड शिवशाही बस येरवडा येथील शास्त्री चौकात आली. तेथे बसमध्ये बिघाड झाला. चालकाने ती बस रस्त्याच्या कडेला उभी केली. त्यानंतर बसमधून तात्काळ सर्व ४२ प्रवाशांना खाली उतरवण्यात आले. प्रवासी खाली उतरल्यानंतर काही वेळातच बसने पेट घेतला. बसच्या पुढच्या भागातून आगीचे लोळ बाहेर पडत होते. तर बसच्या मागच्या भागातून धुराचे लोट बाहेर पडत होते. सुदैवाने, चालकाने प्रसंगावधान राखून बसमधून सर्व प्रवासी खाली उतरवल्याने मोठा अनर्थ टळला. (Maharashtra News)

शिवशाही बसला लागलेली आग आटोक्यात

येरवडा शास्त्री चौकात बसने पेट घेतल्यानंतर एकच गोंधळ उडाला. सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आले होते. बसला आग लागल्याची माहिती मिळताच वाहतूक पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. वाहतूक पोलिसांनी वाहतूक बंद केली होती. तर, अग्निशमन दलाच्या जवानांनी काही वेळात आगीवर नियंत्रण मिळवले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sonia Gandhi: मी माझा मुलगा तुम्हाला सोपवते, राहुल यांच्या निवडणूक प्रचारात सोनिया गांधी यांचं भावनिक भाषण

Beer Bar परवाना देण्यासाठी घेतली सव्वातीन लाखांची लाच, अधिका-यास अटक

Akola Crime News : अकोल्यात एकाच कुटुंबातील तिघांना फाशीची शिक्षा; बहिणीनेच सख्या भावांची आणि भाच्यांची केली होती हत्या

Bhor Mahad ghat road : चाकरमान्यांसाठी महत्वाची बातमी! भोर-महाड महामार्गावरील वरंध घाट बंद, कारण...

Delhi Liquor Policy Case : दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी आता आम आदमी पक्षावरच होणार कारवाई? चार्जशीट दाखल करण्याचं काम सुरू

SCROLL FOR NEXT