सचिन जाधव, साम टीव्ही पुणे
पुण्यातून आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यासदर्भात मोठी बातमी समोर आलीय. पूजा खेडकर यांच्या बाणेर रोडवरील घरी पोलीस दाखल झाले होते. पोलीस घराची पाहणी केल्यानंतर निघून गेल्याची माहिती समोर आलीय. परंतु पोलीस आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या घरी का धडकले होते? याचं कारण अजून गुलदस्त्यात आहे.
मनोरमा खेडकरांना पुणे पोलिसांची नोटीस
पोलिसांनी बाणेर रोडवरील घराबाहेर पोलिसांनी नोटीस लावली (IAS officer Pooja Khedkar) आहे. मनोरमा खेडकरांना नोटीस बजावल्याचं समोर आलंय. त्यांचा शस्त्र परवाना रद्द करण्याबद्दल ही नोटीस असल्याचं सांगितलं जातंय. पूजा खेडकर यांची ऑडी कार वाहतुक विभागाच्या ताब्यात आली आहे. त्यामुळे आता पोलीस याप्रकरणात अजून काय कारवाई करतात, हे पहावं लागणार आहे.
गाडीवर लाल दिवा
पुजा खेडकर वापरत असलेली ऑडी कार त्यांच्या (Pune News) ड्रायव्हरने अचानक रात्री पुण्यातील चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात आणून जमा केली होती. या कारवर लाल दिवा लावून पुजा खेडकर आयएएस अधिकारी असल्याचं दाखवत होत्या. अनेक सरकारी कार्यालयांमध्ये जाताना त्यांनी ही कार वापरली होती. मात्र, प्रशिक्षणार्थी म्हणून ही कार वापरण्याचा त्यांना अधिकार नसल्याने पुणे पोलिसांनी कारवाई सुरू केली.
पुणे पोलिसांची कारवाई
मात्र, दोन दिवसांपुर्वी चौकशीसाठी गेलेल्या पुणे पोलिसांना पुजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर (Manorama Khedkar) यांनी त्यांच्या बंगल्यात प्रवेश दिला नव्हता. मात्र, काल रात्री त्यांच्या ड्रायव्हरने गाडी पोलिसांकडे सोपवली. परंतु, अजून या गाडीची कागदपत्रे पोलीसांकडे सोपविण्यात आलेली नाहीत, असं पोलिसांनी सांगितलं होतं. त्यामुळे आता पोलीस (Pooja Khedkar) पुढे काय कारवाई करणार? हे पाहावं लागणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.