Leopard Attack Saam tv
मुंबई/पुणे

Leopard Attack: दुर्दैवी घटना! बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकलीचा मृत्यू; जुन्नर तालुका हादरला

रोहिदास गाडगेखेड

Junnar Leopard Attack:

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. अशातच आज (ता. ११ एप्रिल) पहाटे जुन्नर तालुक्यात एका चिमुकलीवर बिबट्याने हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे. या हल्ल्यामध्ये चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून घटनेने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जुन्नर (Junnar) तालुका बिबट्याच्या हल्ल्याने पुन्हा हादरल्याची मोठी बातमी समोर आली आहे. जुन्नर तालुक्यातील शिरोली खुर्द गावात बिबट्याने एका चिमुकल्या मुलीवर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये संंस्कृती कुळेकर या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. गावातील संपत मोरे या शेतकऱ्याच्या शेतामध्ये धनगर कुटुंब वास्तव्यास होते.

आज पहाटे या कुटुंबातील चिमुकलीवर बिबट्याने हल्ला चढवला. ज्यामध्ये तिचा मृत्यू झाला. शेतापासून अर्धा किलोमीटर अंतरावर या चिमुकलीचा मृतदेह आढळला. या धक्कादायक घटनेने परिसरामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

दरम्यान, याबाबतची माहिती मिळताच वनविभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे. मागच्या पंधरा दिवसात बिबट्याचा चिमुकल्या मुलांवरील हा दुसरा हल्ला आहे. या घटनांनी परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली असून बिबट्याचा ताबडतोब बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

Indian Oil Job: सरकारी नोकरीची संधी, इंडियन ऑइलमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

Viral Video: मस्तच भावा! 'फुलवंती' गाण्यावर तरुणाचा गुलीगत डान्स; बेधुंद होऊन नाचला, VIDEO ला हजारोंची पसंती

SCROLL FOR NEXT