Pune Latest News Saamtv
मुंबई/पुणे

Pune News: धक्कादायक! पुणेकरांची तहान भागवणाऱ्या खडकवासला धरणात फेकला औषधांचा साठा

Pune Latest News: पुणेकरांची तहान भागवणऱ्या खडकवासला धरणात औषधांचा साठा टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Gangappa Pujari

अक्षय बडवे, प्रतिनिधी

Pune Khadakwasla Dam News:

पुणेकरांसाठी एक महत्वाची आणि चिंता वाढवणारी बातमी. पुणेकरांची तहान भागवणऱ्या खडकवासला धरणात औषधांचा साठा टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारानंतर लाखो पुणेकरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून पाटबंधारे विभागाचे अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, आज (बुधवार, १८ सप्टेंबर) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास चौपाटीजवळ खडकवासला धरणाच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात औषधांचे बॉक्स फेकल्याचे दिसून आले. सुरक्षेसाठी तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांना ही बाब निदर्शनास आली.

हे फेकलेले बॉक्स पाण्याजवळ तर काही औषधांच्या बाटल्या थेट पाण्यात टाकण्यात आलेल्या होत्या. या बॉक्समध्ये इंजेक्शन, भरलेल्या औषधांच्या बाटल्या व इतर साहित्य दिसून आले. या धक्कादायक प्रकाराने सुरक्षा रक्षकही हादरुन गेले. (Pune News)

सुरक्षा रक्षकांनी तातडीने ही माहिती पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत हवेली पोलीसांना कळविल्यानंतर पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या बाटल्या तसेच बॉक्स बाहेर काढण्यात आले आहेत. घटनास्थळी काचांचा खच दिसत असून पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : तुमचा जवळचा मित्र विश्वासघात करण्याची शक्यता; ५ राशींच्या लोकांना जपून निर्णय घ्यावा लागेल

दिवसभर नेटफ्लिक्स आणि जमेल तेव्हा पॉलिटीक्स; शिंदेंचा ठाकरे बंधूंवर जोरदार हल्लाबोल|VIDEO

CM फडणवीसांकडून 'लाव रे तो व्हिडिओ' पॅटर्न; शिवतीर्थावरून ठाकरे बंधूंवर जोरदार हल्लाबोल, VIDEO

मलाईवरुन मुंबई तापली, मुंबईत येतो, पाय छाटून दाखवा

ऐन निवडणुकीत महायुती सरकारला मोठा धक्का; लाडकी बहीण योजनेचे पैसे रखडले, कारण काय?

SCROLL FOR NEXT