Pune Accident News:  Saamtv
मुंबई/पुणे

Pune Accident: सिंहगड रोडवर मद्यधुंद तरुणांचा धिंगाणा! आधी वाहनाला धडक, टायर फुटलेली कार पळवली; पोलिस येताच....

Pune News: पुण्यातील सिंहगड रोडवर मद्यधुंद तरुणांनी धिंगाणा घातल्याचे समोर आले आहे.

Gangappa Pujari

अक्षय बडवे, प्रतिनिधी

Pune Accident News:

पुण्यात मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे गाडी चालवून अपघात झाल्याचे प्रकार वारंवार समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वीच पीएमपीएमएल बस चालकाने दारुच्या नशेत १०- १२ गाड्यांना उडवल्याची घटना घडली होती. असाच आणखी एक प्रकार समोर आला असून दारुच्या नशेत तरुणांनी बेदरकारपणे गाडी पळवल्याची घटना घडली आहे. (Pune Latest News)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुण्यातील (Pune) सिंहगड रोडवर मद्यधुंद तरुणांनी धिंगाणा घातल्याचे समोर आले आहे. तरुणांनी दारुच्या नशेत कार चालवत एका वाहनाला धडक दिली. वाहनाला धडक देऊन तरुणांनी गोऱ्हे बुद्रुक ते खडकवासला धरणाच्या मागच्या बाजूला असलेल्या पूलापर्यंत गाडीचा टायर फुटलेला असतानाही त्याच अवस्थेत भरधाव कार चालवून पळून जाण्याचा प्रयत्न केला.

हा संपूर्ण प्रकार पाहून हवेली पोलीस ठाण्याच्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी या कारचा पाठलाग केला. पोलीस पाठलाग करत असल्याचे लक्षात येताच चालकाने मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका तरुणाला कारमध्ये कोंडून पळून काढला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. तसेच याबाबत अद्याप हवेली पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. संबंधित कारचालक गाडी सोडून पळून गेला असून टायर फुटलेली ही गाडी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. दरम्यान, पुणे शहरात वारंवार मद्यधुंद वाहनचालकांचा धिंगाण पाहायला मिळत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज ठाकरे यांची शिवतीर्थावर नेत्यांची बैठक

New Pension Rule: EPS पगार मर्यादा 25,000 रुपये; पण सर्वांनाच पेन्शन मिळणार नाही! जाणून घ्या नवे नियम

Congress Protest Live Update : "सर्वोच्च न्यायालयाला आंदोलनात ओढू नका!"; सूर्यकांत यांचा स्पष्ट इशारा

White Saree For Womens: महिलांसाठी पांढऱ्या रंगाच्या साड्यांचे सुंदर कलेक्शन, या 5 डिझाईन्स नवरात्रीसाठी बेस्ट

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अचानक टायर फुटला अन् क्षणात पेटला ट्रक, २ जणांचा होरपळून मृत्यू

SCROLL FOR NEXT