Pune News: Chandrakant Patil Vs Ajit Pawar Saam TV
मुंबई/पुणे

Chandrakant Patil: पुण्यात पुन्हा दादा विरुद्ध दादा! चंद्रकांत पाटलांनी अजितदादांना डिवचलं, म्हणाले; 'पवार कुटुंब धुर्त...'

Pune Latest News: अजित पवार हे नाराज आहेत असे वाटत नाही..' असेही ते यावेळी म्हणाले.

Gangappa Pujari

नितीन पाटणकर, प्रतिनिधी

Chandrakant Patil On Ajit Pawar:

दिवाळीनिमित्त पुण्यातील राजकीय परंपरा असणाऱ्या वाडेश्वर कट्ट्याचे आज आयोजन करण्यात आले होते. या वाडेश्वर कट्ट्यावर राजकीय पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले होते. या खास मैफिलीमध्ये भाजप नेते चंद्रकांत दादा पाटील यांच्यासह शहरातील सर्व राजकीय पक्षांचे शहराध्यक्ष हजर होते. यावेळी कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी अजित पवारांबद्दल केलेल्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

भाजप नेते मंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामधील कोल्ड वॉर काही लपून राहिले नाही. चंद्रकांत पाटील यांच्याकडे असलेले पुण्याचे पालकमंत्रीपद अजित पवारांकडे गेल्याने 'दादा विरुद्ध दादा' वाद सुरू झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अशातच पुण्यातील वाडेश्वर कट्ट्यावरील आयोजित कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याने पुन्हा एकदा दादाविरुद्ध दादा वाद रंगण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

अजित पवार यांनी दिवाळीनिमित्त गोविंदबागेत हजेरी लावली. यावर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी "पवार कुटुबाचं एक वैशिष्ट्य आहे. ते राजकीय दृष्ट्या अतिशिय चतुर, चलाख आणि धुर्त आहेत. त्यांच्या पोटात काय ते ओठावर येऊ देत नाहीत," अशी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच अजित पवार हे नाराज आहेत असे वाटत नाही..' असेही ते यावेळी म्हणाले.

दरम्यान, मराठा आरक्षणावर बोलताना चंद्रकांत दादा पाटील यांनी "मराठा बांधवांना २४ डिसेंबरपर्यंत थांबण्याची गरज नाही. कुणबी नोंदी असलेले दाखले मिळायला सुरवात झाली आहे. जशाजशा कुणबी नोंदी सापडतील तसे दाखले प्रचंड वेगाने दिले जात असल्याचे सांगितले आहे. तसेच "लाखो लोकांना कुणबी दाखले मिळतील, मात्र न्यायालयात टिकणारे आरक्षण मिळण्यासाठी वेळ लागेल..." असेही ते यावेळी म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Datiya Bypoll : निवडणुकीत पराभव होताच भाजपचा मोठा निर्णय; अख्खी कार्यकारिणी बरखास्त, पक्षात खळबळ

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

संध्याकाळी टाईमपास खायला बनवा क्रिस्पी मखाना चिवडा; रेसिपी आहे एकदम सोपी

Thursday Horoscope: घरातले वातावरण आनंद राहील; 8 राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार, वाचा उद्याचे राशीभविष्य

Fatty Liver Disease: पायांमध्ये ही 3 महत्त्वाची लक्षणं दिसली तर समजा लिव्हरवर चरबी साचलीये!

SCROLL FOR NEXT