Pune Airport Blast Threat: Saamtv
मुंबई/पुणे

Pune Airport Blast Threat: ७५ वर्षांच्या आजीने दिली पुणे विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी; प्रवाशांचा एकच गोंधळ अन् अधिकाऱ्यांची धावपळ

Pune Blast Threat: या महिलेने "एवढं काय तपासत आहेत? माझ्याकडे बॉम्ब आहे आणि तो ४ ही बाजूने असल्याचे सांगिताच विमानतळावर एकच गोंधळ उडाला.

Gangappa Pujari

अक्षय बडवे, प्रतिनिधी...

Pune Crime News: ७२ वर्षीय महिलेने पुणे विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. विमानतळावर सेक्युरिटी चेकिंग दरम्यान वेळ लागत असल्याने महिलेने ही धमकी दिली. या प्रकाराने विमानतळावरील अधिकारी आणि सुरक्षा रक्षकांची चांगलीच धावपळ झाली.

याबाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळी ८.३० वाजता पुणे विमानतळावर ही खळबळजनक घटना घडली. निता प्रकाश कपलानी (वय ७२) असे धमकी देणाऱ्या महिलेचे नाव असून ती पुणे ते दिल्ली या विमानाने प्रवास करणार होती.

यावेळी फिस्किंग बूथमध्ये सुरक्षा तपासणीसाठी पोलिस अधिकारी जेव्हा त्यांचा तपास करत होत्या तेव्हा त्यांनी "एवढं काय तपासत आहेत? माझ्याकडे बॉम्ब आहे आणि तो ४ ही बाजूने असल्याचे सांगितले. महिलेने असे सांगताच विमानतळावर एकच गोंधळ उडाला. या प्रकाराने विमानतळावरील पोलीस अधिकारी आणि सुरक्षारक्षकांची मोठी धावपळ उडाली.

मात्र ही धमकी म्हणजे खोडसाळपणा असल्याचे लक्षात येताच पोलीसांचा जीव भांड्यात पडला. या प्रकरणात निता प्रकाश कपलानी या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना नोटीसही देण्यात आली आहे. आजीबाईंच्या खोडसाळपणाची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'माझ्या मृत आईच्या दुःखाचा राजकीय बाजार मांडू नका!'; सुषमा अंधारेंवर खासदार आष्टीकरांचा पुत्र भडकला

Mowgli Girl: दहा वर्षांपूर्वी जंगलात सापडलेल्या ‘मोगली गर्ल’चा मृत्यू; १८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Maharashtra News Live Update: खेड तालुक्यात थरारक दुहेरी मृत्यू; पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या

Frankie Recipe: लहानामुलांसाठी या विकेंडला घरच्या घरी बनवा टेस्टी फ्रँकी, वाचा सोपी रेसिपी

Ladki Bahin Yojana : ₹१५०० की ₹३०००, लाडक्या बहि‍णींच्या खात्यात किती महिन्याचे पैसे जमा, वाचा महत्त्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT