Dog  Saam tv
मुंबई/पुणे

BJP MLA : भटक्या कुत्र्यांना पकडा अन् प्राणीप्रेमींच्या घरी सोडा, पुण्यातील भाजप आमदाराचे धक्कादायक वक्तव्य

BJP MLA Mahesh Landge controversial statement : पुण्यातील भाजप आमदार महेश लांडगे यांनी “भटके कुत्रे पकडा आणि प्राणीप्रेमींच्या घरी सोडा” या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.

Namdeo Kumbhar

  • अधिवेशनात भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्यांवरून चर्चा झाली.

  • मुंबई, पुण्यासह राज्यात भटक्या कुत्र्यांची संख्या लाखोंमध्ये असल्याची माहिती सरकारने दिली.

  • चर्चेदरम्यान भाजप आमदार महेश लांडगे यांनी केलेले वक्तव्य वादग्रस्त ठरले.

Pune BJP MLA’s Controversial Stray Dog Statement : मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाच्या शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. चिमुकल्यांसह महिला अन् वयोवृद्ध व्यक्तींवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या अनेक घटना काही दिवसात घडल्या आहेत. याच भटक्या कुत्र्यांवर अंकूश ठेवण्यासाठी प्रत्येक शहरात शेल्टर होमची सोय सरकार आणि प्राणी कल्याण संस्थांद्वारे केली जाते. पण तरीही संख्या काही कमी होताना दिसत नाही. याच मुद्द्यांवरून हिवाळी अधिवेशनात चर्चा झाली होती. या चर्चेवेळी बोलताना भाजप आमदाराने केलेल्या "भटक्या कुत्र्यांना पकडा अन् प्राणीप्रेमींच्या घरी सोडा" या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटलेय. पाहूयात सर्व प्रकरण सविस्तर...

नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनावेळी भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या वाढत्या संख्येवरून जोरदार चर्चा झाली. राज्य मंत्री माधुरी मिसाळ यांनी भटक्या कुत्र्यांच्या संख्येबाबत माहिती दिली. मुंबईत ९०,७५७ भटके कुत्रे आहेत. राज्यातील २९ महानगरपालिकांमध्ये एकूण १.१८८ दशलक्ष भटके कुत्रे आहेत. पण त्यांच्यासाठी शेल्टर होम मर्यादित आहेत. बीएमसीकडे आठ तर राज्यात फक्त १०५ शेल्टर होमची संख्या आहे. यावर तोडगा काढण्यासाठी सरकार लवकरच एक विशेष बैठक बोलवणार असल्याचेही मिसाळ यांनी सांगितले.

भाजप आमदाराच्या वक्तव्याने वाद -

भटक्या कुत्र्यांवरील चर्चेदरम्यान भाजप आमदार महेश लांडगे यांनी प्राणीप्रेमींवर यावर उपाय शोधण्यात अडथळा आणल्याचा आरोप केला. मागील ३ वर्षांत पुण्यात एक लाखांहून अधिक कुत्रे चावण्याच्या घटना घडल्या आहेत. यांच्यावर उपाय शोधण्यात प्राणीप्रेमी नेहमीच अडथळा आणतात. त्यामुळे या भटक्या कुत्र्यांना पकडून प्राणीप्रेमींच्या घरात सोडले पाहिजे, असे भाजप आमदार लांडगे म्हणाले.

सर्व मोकाट कुत्री प्राणी मित्रांच्या घरी नेऊन सोडा, भाजप आमदार नेमकं काय म्हणाले ?

आपल्या पिंपरी चिंचवडसह पुणे जिल्ह्यात तसेच राज्यातील प्रमुख शहरांमध्ये मोकाट कुत्र्यांचा उच्छाद चिंताजनकरीत्या वाढला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये वर्षभरात 8 हजारांहून अधिक तर पुणे परिसरात तीन वर्षांत 1 लाखांपेक्षा जास्त नागरिकांवर कुत्र्यांनी हल्ले केले आहेत. तरीही स्थानिक स्वराज्य संस्थांकडून ठोस उपाययोजना होत नाहीत. मोकाट कुत्र्यांवर कारवाई केल्यास प्राणीमित्र संघटना गोंधळ घालतात, पण जखमी नागरिकांच्या वेदनांकडे कोण लक्ष देणार? याबाबत सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सूचना दिल्या असून शासनाने तातडीने कठोर धोरण राबवण्याची गरज आहे. नाहीतर सर्व मोकाट कुत्री प्राणी मित्रांच्या घरी नेऊन सोडा.कारण नागरिकांची सुरक्षा सर्वांत प्रथम असल्याचे महेश लांडगे म्हणाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'भाजपचा वॉच, नगरसेवकांचे फोन टॅप'; संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

Maval Politics: फॉर्म भरण्याच्या दिवशीच मावळात हाय व्होल्टेज ड्रामा; राष्ट्रवादी-भाजप कार्यकर्ते आमने-सामने

महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; भाजप शिंदेसेनेविरोधात पोलिसात जाणार, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Fact check: कर्ज देणारा करोडपती भिकारी...; व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

Maharashtra Politics: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणार का? अजित पवारांच्या गटातील बड्या नेत्याचं मोठं विधान

SCROLL FOR NEXT