Pune Viral Video Saam TV
मुंबई/पुणे

Pune Viral Video : भात लावणी करताना एकापाठोपाठ 6 ट्रॅक्टर चिखलात रुतले; भोरमधील विचित्र प्रसंग, पाहा VIDEO

Viral Video : भोरमधील नऱ्हे गवतील भात लावणी दरम्यान हा प्रसंग घडलाय. मात्र या सगळ्यात एका रुतलेल्या ट्रॅक्टरला काढण्यासाठी एकूण 10 ट्रॅक्टर लागल्यानं परिसरात याची चांगलीच चर्चा रंगलीये.

सागर आव्हाड साम टीव्ही पुणे

पुण्याच्या भोरमध्ये एक विचित्र प्रसंग पाहायला मिळालाय. भात लावणी करताना एक ट्रॅक्टर शेतातील चिखलात रुतला. त्याला काढण्यासाठी इतर ट्रॅक्टर बोलावले ते देखील चिखलात रुतले, असे एकापाठोपाठ एक ६ ट्रॅक्टर रुतले आहेत. भोरमधील नऱ्हे गवतील भात लावणी दरम्यान हा प्रसंग घडलाय. या सगळ्यात एका रुतलेल्या ट्रॅक्टरला काढण्यासाठी एकूण 10 ट्रॅक्टर लागल्यानं परिसरात याची चांगलीच चर्चा रंगलीये.

सध्या पावसाचा जोर चांगला असल्यामुळे भात लावणीच्या कामाला वेग आला आहे. लावणीसाठी शेतात गाळ करावा लागतो. याच गाळात एकापाठोपाठ एक असे तब्बल 10 ट्रॅक्टर अडकलेत. सकाळी ११ च्या सुमारास ही घटना घडली. नऱ्हे येथील शेतकरी राजेश गोळे यांच्या शेतात भात लावणीसाठी टँक्टरच्या सहाय्याने चिखलाचे काम सुरु असताना अचानक चिखल करत असताना ट्रॅक्टर चिखलात अडकला.

परंतु प्रयत्न करुनही तो ट्रॅक्टर बाहेर काढता आला नाही. म्हणून अडकलेला ट्रॅक्टर मालक योगेश शिळीमकर, शेतकरी यांनी परिसरातील ट्रॅक्टर बोलावून ट्रॅक्टर बाहेर काढण्यासाठी एकमेकांना जोडले. परंतु तेही पाच ट्रॅक्टर चिखलात अडकले. काही वेळात शेतकऱ्याने उशिराने ट्रॅक्टर चालकांना सांगितले की त्या ठिकाणी जलजीवन मशिनच्या पाईप लाईनची चारी शेताच्या खाचरातून गेली आहे.

त्यानंतर ट्रॅक्टर चालक यांनी आणखी चार ट्रॅक्टर बोलावून त्यांना भात शेतीच्या बाहेर उभे करुन एक एक ट्रॅक्टर बाहेर काढला. यासाठी ट्रॅक्टर चालक रामचंद्र जाधव, भिमा धोंडे, महेश चंदनशिव, योगेश शिळीमकर, हेंमत दाभाडे, आदित्य आवाळे, अनिल कुंभार यांनी विशेष सहकार्य केले. आता या घटनेची गावभर चर्चा सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्याला बेड्या, नेमकं प्रकरण काय?

Karva Chauth 2025: स्त्रिया करवा चौथ व्रत करताना चंद्राची पूजा का करतात? जाणून घ्या कारण

Maharashtra Politics: NCP अजित पवार गटाच्या बड्या नेत्याला अटक, राजकीय वर्तुळात खळबळ

शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार? या केंद्रीय मंत्र्याचं सूचक विधान|VIDEO

Malti Chahar : तान्या मित्तलला रडवणारी मालती चहर आहे तरी कोण?

SCROLL FOR NEXT