Baramati Tandulwadi Mother And Son Death | Police Investigation AI Image
मुंबई/पुणे

Shocking : बारामती हादरली! आई आणि मुलाने संपवलं आयुष्य, पोलिसांनी घराचा दरवाजा उघडला अन्...

Pune Baramati Crime News : बारामती तालुक्यातील तांदुळवाडी येथे ४१ वर्षीय महिला आणि १७ वर्षीय मुलाचा घरात मृतदेह आढळला. बारामती ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत.

Alisha Khedekar

  • बारामती तालुक्यातील तांदुळवाडी गावात दुहेरी आत्महत्या

  • आई आणि मुलाचा मृतदेह बंद खोलीत आढळला

  • पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.

बारामती तालुक्यातील तांदुळवाडी गावात शुक्रवारी सकाळी एका ४१ वर्षीय महिला आणि तिच्या १७ वर्षीय मुलाचा मृतदेह घरात आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. प्राथमिक तपासात हा आत्महत्येचा प्रकार असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून, बारामती ग्रामीण पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यापासून सुमारे १०२ किलोमीटर अंतरावर ही घटना घडली. तांदुळवाडी गावात घरातील एका खोलीत १७ वर्षीय मुलगा छताच्या अँगलला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. तर त्याची ४१ वर्षीय आई खिडकीजवळ जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसून आली. या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलाचे वडील रात्रीची ड्युटी करून शुक्रवारी सकाळी घरी परतले. त्यावेळी घराचा दरवाजा आतून बंद होता. त्यांनी दरवाजा ठोठावूनही आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. परिस्थिती संशयास्पद वाटल्याने त्यांनी शेजाऱ्याच्या मदतीने दरवाजा उघडला. घरात गेल्यानंतर त्यांना पत्नी खिडकीजवळ रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली, तर मुलगा छताच्या अँगलला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.

त्यानंतर वडिलांनी दोघांनाही तातडीने बारामती येथील शासकीय रुग्णालयात नेले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर दोघांनाही मृत घोषित केले. या प्रकरणी बारामती ग्रामीण पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, प्राथमिकदृष्ट्या आई आणि मुलाचा मृत्यू आत्महत्येमुळे झाल्याचा संशय आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण आणि घटनेमागील परिस्थिती तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली असून, संबंधित व्यक्ती आणि कुटुंबीयांकडून माहिती घेतली जात आहे. आई आणि मुलाच्या मृत्यूमागे कोणते कारण होते, याचा तपास सध्या बारामती ग्रामीण पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राजू शेट्टींच्या नेतृत्वाखालील जलसमाधी आंदोलन स्थगित; 15 दिवसांत सरकार काय निर्णय घेणार?

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक; काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर, कोणाला मिळाली संधी?

विधानसभा निवडणुकांआधी २ राज्यांत मोठा उलटफेर; काँग्रेसनं मोक्याच्या क्षणी मारला चौका

Maharashtra Politics : भाजप, शरद पवार गटाला मोठा धक्का; माजी मंत्री नाईकांच्या नातीसह शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

पूर्णेकर हत्येवरून ठाकरे-शिंदे संघर्ष टोकाला, नाईकांनी करावं ठाण्याचं नेतृत्व ' राऊतांनी शिंदेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT