Rakshabandhan Gift To Sisters Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: बहि‍णींसाठी रिक्षाचालक भावांची खास भेट! पुण्यात आज महिलांना करता येणार मोफत प्रवास

Rakshabandhan Gift To Sisters: पुण्यातील महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. आज रक्षाबंधनानिमित्त महिलांना १०० रुपयापर्यंतचा प्रवास मोफत करता येणार आहे.

Siddhi Hande

आज महाराष्ट्रात घराघरात रक्षाबंधन सण साजरा केला जाणार आहे. बहीण आपल्या भावाला राखी बांधणार आहे. रक्षाबंधन हा दिवस बहीण भावांसाठी खूप स्पेशल असतो. भाऊ आपल्या बहीणीला गिफ्ट देतो. अशीच भेटवस्तू पुण्यातील रिक्षाचालक बहि‍णींना देणार आहे. रक्षाबंधनानिमित्त महिला प्रवाशांना पुण्यात १०० रुपयांपर्यंत मोफत रिक्षा प्रवास करता येणार आहे.

रक्षाबंधनानिमित्त अनेक महिला आपल्या कुटुंबियांना भेट देण्यासाठी पुण्याला येतात. त्यामुळेच या महिलांसाठी १०० रुपयापर्यंतचा प्रवास मोफत करता येणार आहे. यंदा रक्षाबंधनानिमित्त आज सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत महिलांना मोफत रिक्षा प्रवास करता येणार आहे.

पुणे स्टेशन येथील रिक्षा मित्र प्रीपेड बूथवरुन प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना मोफत प्रवास करता येणार आहे. १०० रुपयापर्यंतचा प्रवास महिलांना मोफत करता येणार आहे. जर १०० रुपयांपेक्षा जास्त भाडे झाले तर त्या भाड्यातून १०० रुपयांची सूट देण्यात येणार आहे.

रिक्षाचालक बांधवातर्फे महिला प्रवाशांना ही रक्षाबंधनाची खास भेट आहे. महिला प्रवाशांना आज या मोफत रिक्षा प्रवास सेवेचा लाभ घ्यावी, असे आवाहन रिक्षा संघटनांनी केले आहे. त्यामुळे पुण्यात जाणाऱ्या बहि‍णींसाठी प्रवास खूपच सुखकर होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जरांगे पाटील यांनी आंदोलन स्थगित करावं- प्रसाद लाड

मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट सोशल अकाऊंट, होमगार्डला अटक; जळगाव कनेक्शन आले समोर

Pune News: दहीहंडीत अश्लील नृत्य, पुण्यात डान्सर निशा मुंबईकर अन् शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

Heart Attack : बाहेरून फिट दिसत असलात तरी सावध! हार्ट अटॅकचा धोका वाढवू शकतात या ४ गोष्टी

Bribe Case : पुण्यात API ला २,५०,००० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं, असा सापडला जाळ्यात

SCROLL FOR NEXT