मनोज तांबे, साम टीव्ही
पुण्यातील दौंड शहरात पावसाने महिलेचा बळी गेल्याची घटना ताजी असताना विरारमध्येही एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विरारच्या गोपचर पाड्यातील पूजा अपार्टमेंटमध्ये घरातील स्लॅब कोसळून ३५ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. महाराष्ट्रात आज दिवसभरात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे दुसरा बळी गेला आहे.
राज्यात मान्सूनला सुरुवात झाली आहे. मान्सूनच्या पहिल्याच पावसाने जनजीवन विस्कळीत झालं आहे. पुण्यातील दौंड शहरात 75 वर्षीय वृद्ध महिलेच्या अंगावर घराची भिंत पडल्याने मृत्यू झाला. त्यानंतर विरारमध्ये एका महिलेचा बळी गेला आहे. विरारच्या गोपचर पाड्यातील पूजा अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली.
महिला तिच्या सात महिन्याच्या आणि तीन वर्षाच्या मुलांसह हॉलमध्ये झोपली होती. त्यावेळी घरातील स्लॅब तिच्या डोक्यावर पडला. या घटनेत तिचा मृत्यू झाला. लक्ष्मी राजू सिंह असे महिलेचे नाव आहे. ती या इमारतीमध्ये भाडेतत्वावर राहण्यासाठी आली होती. वसई-विरार शहरात स्लॅब कोसळण्याची ही दुसरी घटना घडली आहे. शुक्रवारी विजेचा धक्का लागून एका तरुणाचा मृत्यू झाला होता.
पुण्यातील दौंड शहरात मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसाने दौंडमध्ये पहिला बळी घेतला आहे. दौंडमध्ये ७५ वर्षीय वृद्ध महिलेच्या अंगावर घराची भिंत पडल्याने मृत्यू झाला आहे. दौंड शहरात जुन्या बांधकामाची भिंत अंगावर पडल्याने 75 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झालाय.
ताराबाई विश्वचंद आहिर ७५ वर्षीय वृद्ध महिलेचे नाव आहे. ताराबाई या दुकानात बसल्या होत्या. त्याचवेळी भिंत अंगावर कोसळून वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. या जखमी वृद्ध महिलेवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.