eknath shinde news  Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना पुन्हा मोठा धक्का; पुणे, नाशिकमधील पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदेंचं धनुष्यबाण उचललं

Eknath shinde News : उद्धव ठाकरेंना पुन्हा मोठा धक्का बसलाय. पुणे, नाशिकमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदेंचं धनुष्यबाण उचललं आहे.

Vishal Gangurde

मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी ठाकरे गटाने जोरदार तयारी सुरु केली आहे. एकीकडे उद्धव ठाकरे यांनी आगामी निवडणुकीसाठी रणशिंग फुंकलं आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाला गळती सुरुच आहे. पक्षाचे राज्य सचिव संजय लाखे यांनी काल पक्षाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता पुणे, नाशिकमधील पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. आगामी निवडणुकीच्या तोंडावरच ठाकरेंना मोठा धक्का बसलाय.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आगामी निवडणुकीच्या तोंडावर मोर्चेबांधणी सुरु केली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यात शिंदेंच्या शिवसेनेने बैठकांचा सपाटा लावला आहे. आगामी निवडणुकीच्या तोंडावर पक्षातील विविध नेत्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याचबरोबर येत्या निवडणुकीत ठाकरेंना घेरण्यासाठी ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांना आपल्या बाजूने वळवण्याचं काम शिंदेंच्या शिवसेनेकडून सुरु झालं आहे. जालन्यातील डॉ. संजय लाखे यांनी काल उद्धव ठाकरेंना रामराम केला. त्यानंतर आज सोमवारी पुणे,नाशिकमधील पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंची साथ सोडली आहे.

ठाकरे गटाचे पुणे आणि नाशिकमधील महत्वाच्या पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. ठाकरेंच्या महत्वाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मुंबईतील मलबार हिल येथील मुक्तगिरी बंगल्यात पक्षप्रवेश सोहळा पार पडला. पुणे आणि नाशिकमधील महत्वाच्या शहरातील पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंची साथ सोडल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.

जालन्यात ठाकरेंना धक्का

जालन्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्य सचिव डॉ. संजय लाखे पाटील यांनी काल राजीनामा दिलाय. लोकसभेचे तिकीट देण्याचा शब्द उद्धव ठाकरेंनी पाळला नाही, असं म्हणत डॉ. संजय लाखे यांनी शिवसेनेची साथ सोडली. यावेळी अंबादास दानवे यांच्यावर लाखे पाटील यांनी गंभीर आरोप केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News : आजारी आजीला तरुणाने पाठीवर बसवून रुग्णालयात नेलं, ५ किमीपर्यंत पायपीट; पुणे जिल्ह्यातलं भयंकर वास्तव

Heart Disease: धक्कादायक! भारतातील ४ पैकी एका व्‍यक्‍तीला अनुवांशिक घटकांच्या जोखीमेमुळे हृदयाच्या आजारांचा धोका

Maharashtra Live News Update: केळी पीक विम्याच्या लाभातील प्रशासकीय अडथळा अखेर दूर

Box Office: 'जॉली एलएलबी ३' आणि दशावतारमध्ये काटे की टक्कर; कोणी मारली बाजी तिकिट खिडकीवर बाजी?

भय इथले संपले नाही! सोलापूर अन् धाराशिवमध्ये पावसाचा जोर कायम; पुढील २४ तास धोक्याचे

SCROLL FOR NEXT