Pune News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Puma Clothes Fraud : तुम्ही घातलेले 'पुमा'चे कपडे बनावट? पुण्यातून धक्कादायक प्रकार उघडकीस

Pune News : पुण्यातील आंबेगाव परिसरातील एका दुकानावर पोलिसांनी छापा टाकून बनावट ‘पुमा’ टी-शर्ट, बूट, ट्रॅक पॅन्ट असा ८ लाख १३ हजार रुपयांचा माल जप्त केला. दुकानमालकावर कॉपीराईट कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Alisha Khedekar

  • आंबेगाव परिसरातील स्टायलॉक्स फॅशन शॉपवर पोलिसांचा छापा.

  • बनावट ‘पुमा’ माल जप्त; किंमत ८ लाख १३ हजार रुपये.

  • आरोपीवर कॉपीराईट कायद्यानुसार गुन्हा दाखल.

  • ग्राहकांनी बनावट ब्रँडेड वस्तूंपासून सावध राहावे, असे आवाहन पोलिसांचे.

पुण्यातील आंबेगाव परिसरात कॉपीराईट कायद्याचा भंग करणाऱ्या बनावट वस्तूंच्या विक्रीचा एक प्रकार उघडकीस आला असून, पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बनावट माल जप्त करून गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई आंबेगाव येथील स्टायलॉक्स फॅशन शॉपवर करण्यात आली. या दुकानातून ‘पुमा’ कंपनीचे नाव आणि लोगो वापरून बनावट टी-शर्ट, बूट, चप्पल आणि ट्रॅक पॅन्टची विक्री केली जात होती. पोलिसांनी या दुकानावर छापा टाकत मुद्देमाल जप्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ‘पुमा’ कंपनीच्या अधिकृत प्रतिनिधींना आंबेगाव परिसरातील एका दुकानामध्ये त्यांच्या कंपनीच्या नावाचा आणि लोगोचा वापर करून बनावट मालाची विक्री सुरू आहे, अशी माहिती मिळाली होती. ही माहिती मिळताच त्यांनी थेट पोलिसांकडे तक्रार नोंदवली. तक्रारीच्या आधारे आंबेगाव पोलीस ठाण्याच्या पथकाने छापा टाकून मोठ्या प्रमाणावर बनावट वस्तू जप्त केल्या.

पोलिस तपासात समोर आले की, या दुकानात २ लाख ३२ हजार रुपये किंमतीचे २९० टी-शर्ट, २ लाख ४९ हजार रुपये किंमतीचे ५९ बूट, तसेच २ लाख ३७ हजार रुपये किंमतीचे १९८ पॅन्ट अशा एकूण ८ लाख १३ हजार ७५० रुपयांच्या वस्तू विक्रीसाठी मांडण्यात आल्या होत्या. या सर्व वस्तूंवर ‘पुमा’ कंपनीचा लोगो आणि नाव छापलेले होते, मात्र त्या अधिकृत उत्पादन नव्हत्या.

या कारवाईनंतर दुकान मालक शिवम लालबाबु गुप्ता याच्याविरुद्ध आंबेगाव पोलीस ठाण्यात कॉपीराईट कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, अशा प्रकारे बनावट ब्रँडेड वस्तूंची विक्री करणे हा केवळ ग्राहकांची फसवणूक नाही, तर कंपनीच्या बौद्धिक संपदेवर थेट आघात आहे.

सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, या बनावट मालाचा पुरवठा करणाऱ्या स्रोतांपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिस प्रयत्न करत आहेत. ग्राहकांनीसुद्धा अशा खोट्या ब्रँडेड वस्तूंच्या खरेदीपासून सावध राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. या कारवाईनंतर आंबेगाव परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये आणि ग्राहकांमध्ये एकच चर्चा सुरू आहे की, ब्रँडेड नावाखाली विकल्या जाणाऱ्या वस्तू खऱ्या आहेत की बनावट, हे तपासूनच खरेदी करणे गरजेचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pawan Singh Wife: 'मी एक तुच्छ महिला...'; प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीने मागितली आर्थिक मदत, सोशल मीडियावर शेअर केला क्यूआर कोड

लाडकी बहिण योजनेसाठी ekyc कशी कराल ? कोणते कागदपत्रे लागतात?

Maharashtra Live News Update: शेतकऱ्यांची भावना उद्धव ठाकरे यांना समजली, म्हणून त्यांनी तत्काळ कर्जमाफी केली - ओमराजे निंबाळकर

Customer Alert : सावधान! D-Mart मध्ये महिलांना हेरायचा अन् सोनं-पैशावर डल्ला मारायचा, पोलिसांनी सीरियल स्नॅचर’च्या मुसक्या आवळल्या

Manoj Jaranage Patil: मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या हत्येचा कट, अडीच कोटींची सुपारी, धक्कादायक माहिती समोर

SCROLL FOR NEXT