Pune Accident News  AI Image
मुंबई/पुणे

Pune Accident : भीषण अपघात! मतदान केंद्रावर बूथ प्रतिनिधीला घेऊन जाणारी कार विद्यार्थ्यांना धडकली; एका मुलीचा मृत्यू

Pune Accident News : पुण्यातील खेड तालुक्यातील कुरकुंडी फाट्याजवळ कारच्या धडकेत विद्यार्थिनी आदिती नवनाथ राळे हिचा मृत्यू झाला, तर अनेक विद्यार्थी जखमी झाले.

Alisha Khedekar

  • खेड तालुक्यातील कुरकुंडी फाट्याजवळ कारच्या धडकेत आदिती नवनाथ राळे हिचा मृत्यू

  • एसटी बसची वाट पाहत असलेल्या विद्यार्थिनींना कारने धडक दिली

  • हा अपघात सकाळी सुमारे आठ वाजता झाला

पुण्यातील खेड तालुक्यातील शिरोली-पाईट मार्गावर कुरकुंडी फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मृत्यू झाला असून, अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. आदिती नवनाथ राळे असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, अपघातानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईवरून ग्रामस्थांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी आठच्या सुमारास कुरकुंडी फाट्यावर हा अपघात घडला. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान केंद्रावर बूथ प्रतिनिधीला घेऊन जाणारी कार या मार्गावरून जात होती. त्याचवेळी एसटी बसची वाट बघतं रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या शाळेतील विद्यार्थिनींना या कारने जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता एवढी मोठी होती की काही विद्यार्थी जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना आदिती राळे हिचा मृत्यू झाला. या घटनेने तिच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

अपघातानंतर संबंधित कारचा चालक घटनास्थळावरून निघून गेल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच पोलिसांच्या कारवाईवरून वाद निर्माण झाला. अपघातग्रस्त वाहन घटनास्थळी ठेवून त्याचा पंचनामा आणि आवश्यक तपासणी केल्यानंतरच ते हलविण्यात यावे, अशी ग्रामस्थांची अपेक्षा होती. मात्र, पोलिसांनी कारचा घटनास्थळी पंचनामा न करताच ती पाईट पोलीस चौकीकडे नेण्यास सुरुवात केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.

पोलिसांच्या या कृतीला नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शविला. यावेळी पोलिस आणि ग्रामस्थांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचे सांगण्यात येते. अपघातग्रस्त वाहनाला संरक्षण दिले जात असल्याची भावना काही ग्रामस्थांनी व्यक्त करत, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली.या अपघातामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. जखमी विद्यार्थ्यांवर योग्य उपचार व्हावेत, अपघाताच्या कारणांचा सखोल तपास व्हावा आणि दोषींवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : दिवाळीनंतर सोन्या-चांदीच्या भावात मोठी घसरण! सराफ बाजारात २५० कोटींची उलाढाल; जाणून घ्या नवे दर

Ind vs NZ : टीम इंडियाचा कॅप्टन बदलला; रोहित शर्माचा सलामीचा भिडू बदलणार, कशी असेल संभाव्य प्लेइंग इलेव्हन?

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! परीक्षेच्या वेळेत ४५ मिनिटांचा बदल; नवीन टाइम काय?

Maharashtra News Live Update: नागपूर ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; १४३ किलो डोडा पावडरसह ३९ लाखांचा मुद्देमाल जप्त

IMD Today Weather: तिहेरी संकट! १६ राज्यांना इशारा; जोरदार वारं, भयंकर गारठा आणि मुसळधार पाऊस; महाराष्ट्रात काय स्थिती?

SCROLL FOR NEXT