pune news Saam tv
मुंबई/पुणे

पुण्यात भरधाव कारचा थरार; ६ दुचाकींसह रिक्षाला उडवले, ४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

pune road accident : पुण्यात भरधाव कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात ६ दुचाकींसह रिक्षाला उडवले. यात एकाचा मृत्यू झाला.

Vishal Gangurde

पुण्यात भीषण अपघाताचा थरार

खडकवासला धरणाकडे जाताना घडला भीषण अपघात

अपघातात एकाचा मृत्यू

सचिन जाधव, साम टीव्ही

पुण्यातील खडकवासला गावात एका भरधाव कारने भीषण अपघात केल्याची धक्कादायक घटना घडलीये. बेजबाबदार चालकाने कार भरधाव वेगाने चालवून ६ दुचाकी आणि एका रिक्षाला जोरदार धडक दिली. रस्त्यावरील भीषण अपघातात एका ४ वर्षीय चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर ३ ते ४ जण गंभीर जखमी झाले आहेत..

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील खडकवासला गावात काल सायंकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. यशराज निलेश कांबळे असे या अपघातात मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे.

कारमधील प्रवासी खडकवासला धरण भागाकडे निघाले होते. खडकवासलाच्या धरणाकडे जाताना सायंकाळी साडेपाचच्या सुमारास चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं. त्यानंतर कार रस्त्यावरील ६ दुचाकी वाहनांना आणि एका रिक्षाला धडक दिली. या वाहनांना धडक दिल्यानंतर कार रस्त्याच्या विरुद्ध बाजूच्या दुकानात घुसली. या भीषण अपघातामुळे दुचाकी वाहनांचे आणि रिक्षाचे प्रचंड नुकसान झालंय. अपघातात ३ ते ४ नागरिक गंभीर जखमी झालेत.

या अपघातात गंभीर जखमी झालेल्या ४ वर्षांच्या यशराज कांबळे याला तातडीने सिंहगड रोडवरील जगताप हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र, उपचार सुरू असतानाच यशराजने सायंकाळी ६:४० वाजण्याच्या सुमारास जीव सोडला.

या अपघातानंतर पोलिसांनी कार चालक अमोल गोरक्षनाथ गेगडे (वय ३२) आणि त्याचा साथीदार प्रकाश तात्याराम कोठारे (वय ३२) या दोघांना ताब्यात घेतलंय. दोघांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी त्यांना पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलंय.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. पोलिसांनी आरोपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू केली. पुढील तपास नांदेड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : देशातील सर्वाधिक हॉट सिटी अमरावतीत तापमानाचा पारा ४६ अंशावर

Heart Attack In Kids: लहान मुलांमध्ये ही ५ लक्षणं दिसली व्हा सावध; हार्ट अटॅकचा असतो धोका

Shocking : पुण्यात वडिलांचा मुलावर ॲसिड हल्ला, धक्कादायक कारण समोर

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना आणखी एक संधी मिळणार; राज्य सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

Rose Water For Hair: केस होतील सिल्की आणि कोंडा होईल गायब! अश्या पद्धतीने केसांना लावा 'गुलाबपाणी'

SCROLL FOR NEXT