Pune Accident News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Accident: ह्रदयद्रावक! ट्रकच्या चाकाखाली चिरडून पादचारी तरुणाचा दुर्देवी मृत्यू; चालक अटकेत

Pune Katraj Accident: अपघातात मृत्यू पावलेल्या पादचारी इसमाची ओळख पटली नसून ट्रक चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Gangappa Pujari

सचिन जाधव, प्रतिनिधी...

Pune Accident News: पुणे शहरात एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. पुण्यातील कात्रज चौक परिसरात ट्रकच्या चाकाखाली आल्याने पादचारी इसमाचा दुर्देवी मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. या पादचारी तरुणाची ओळख अद्याप पटली नसून पोलिस अधिक तपास करत आहेत...

याबाबत अधिक माहिती अशी की, ट्रकच्या मागच्या चाकाखाली पादचारी सापडल्याने झालेल्या अपघातात जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पुण्यातील (Pune) कात्रज चौक येथील जुन्या बस स्टॉप समोर रात्री आठच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली. अपघातात मृत्यू पावलेल्या पादचारी इसमाची ओळख पटली नसून ट्रक चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

तसेच अनोळखी मृतदेह ससून येथे शवच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या अपघाताचा पुढील तपास भारती विद्यापीठ पोलिस करत आहेत. या दुर्देवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Latest Marathi News)

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात रस्ते अपघातांचे सत्र सुरू आहे. बुधवार (१७, मे) ला सांगलीच्या (Sangli) मिरज तालुक्यातील वड्डी येथे भीषण अपघातात 5 जण जागीच ठार झाले आहेत. रत्नागिरी - नागपूर महामार्गावर बोलेरो गाडी आणि ट्रॅक्टरची समोरा-समोर धडक होऊन हा भीषण अपघात घडला. देवदर्शनाला जाताना एकाच कुटूंबावर काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.. (Accident)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

5 Sweet Foods For Diabetes: डायबिटीजच्या रूग्णांसाठी ५ गोड पदार्थ फायदेशीर; रक्तातील साखर राहील नियंत्रणात

H1N1 flu symptoms: साधा ताप समजून दुर्लक्ष करताय? H1N1 ची ही गंभीर लक्षणं दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या

Tingling In Feet : तुमच्या पायांना सतत मुंग्या येतात; 'या' गंभीर आजाराचे आहे लक्षण, असा कराल बचाव?

Maharashtra News Live Update: समृद्धी महामार्गावरील दरोडाच्या सूत्रधार बीडमधून जेरबंद

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत मोठा घोटाळा? 14,298 पुरुषांना मिळाले ₹1,500; धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT