Pune Accident News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Accident News: पुण्यात भीषण अपघात! भरधाव कंटेनर उलटला, दोघांचा जागीच मृत्यू

Overloaded Container Accident In Shewalewadi: सोलापुर पुणे हायवेवर भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये ड्रायव्हर आणि क्लिनरचा मृत्यू झाला आहे.

Rohini Gudaghe

सागर आव्हाड साम टीव्ही, पुणे

सोलापुर पुणे हायवेवर भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये ड्रायव्हर आणि क्लिनरचा मृत्यू झाला आहे. ब्रेक दाबल्याने ओव्हरलोड कंटेनर उलटला आणि भीषण अपघात झाला. पुण्यातील शेळकेवाडी येथे ही घटना घडली आहे. या अपघातात दोन जणांची जीव गेला आहे. १७ मे रोजी पहाटे एक ते दीडच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.

या अपघातामध्ये कंटेनर रस्त्यावर उलटला (Pune News) होता. त्यामुळे सोलापूर पुणे हायवेवर वाहतुक कोंडी झाली होती. त्यामुळे तात्काळ हडपसर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी काही कालावधीमध्ये वाहतूक सुरळीत केली आहे. सध्या सोलापूर पुणे हायवेवर सुरू असल्याची माहिती मिळत (Pune Accident News) आहे. या हायवेवर अपघातांचं प्रमाण वाढलं आहे. रात्रीच्या वेळी या हायवेवर अपघात मोठ्या प्रमाणात होत असल्याचं दिसत आहे. शेवाळेवाडी येथील घटना समोर आली आहे. ब्रेक दाबल्यामुळे ओव्हरलोड कंटेनरचा अपघात झालाय.

पालघरमध्ये देखील असाच एक भीषण अपघात झाल्याचं समोर आलं (Road Accident) आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर गुजरातहून मुंबईकडे जाणाऱ्या वाहिनीवर मेंढवन खिंड येथे कंटेनर पलटी झाला. त्यामुळे महामार्गावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या भीषण अपघातामध्ये कंटेनर चालक जखमी झाला आहे. या चालकावर रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

या भीषण अपघातामुळे गुजरातहुन मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मेंढवन खिंड येथे पलटी झालेल्या कंटेनरला बाहेर काढण्याचं काम सुरू (Accident News) आहे. मात्र, मुंबईकडे जाणारी वाहतूक एका लेनने सुरू करण्यात आली आहे. वाहनांना एका बाजुने मार्ग मोकळा करून देण्यात आला आहे. भरधाव वेगामुळे वाहनांचा अपघात होण्याची संख्या वाढली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT