Pune Hadapsar Saswad Road Accident Woman Saam TV
मुंबई/पुणे

Pune Accident News: पुण्यात भयानक अपघात, स्वच्छता महिला कर्मचाऱ्याला कारने फरफटत नेलं; घटनास्थळावर आक्रोश

Pune Accident: स्वच्छता महिला कर्मचारी सासवड रस्ता पदपथालगत साफसफाई करीत असताना अचानक भरधाव वेगात कार आली. क्षणात या कारने महिला कर्मचाऱ्याला दूरपर्यंत फरफटत नेलं.

साम टिव्ही ब्युरो

Pune Accident News: विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात सोमवारी पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. स्वच्छता महिला कर्मचारी सासवड रस्ता पदपथालगत साफसफाई करीत असताना अचानक भरधाव वेगात कार आली. क्षणात या कारने महिला कर्मचाऱ्याला दूरपर्यंत फरफटत नेलं. या भयानक घटनेत महिलेचा जागीच मृत्यू झाला. (Latest Marathi News)

छाया भजनदास शिंदे (वय ४५, रा. विशाल झोपडपट्टी, आकाशवाणी, हडपसर) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. सोमवारी (ता. ५) सकाळी पावणेआठ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. या घटनेनंतर घटनास्थळी मोठा आक्रोश पाहायला मिळाला.

मिळालेल्या माहितीनुसार, छाया शिंदे या पालिकेच्या (Pune News) सातववाडी आरोग्य कोठीकडे कंत्राटी स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करीत होत्या. हडपसर-सासवड महामार्गावर सातववाडी जवळ त्या नेहमीप्रमाणे झाडलोट करीत होत्या.

त्यावेळी सासवडकडे जाणाऱ्या एका खासगी प्रवासी मोटारीने पदपथावरील वडाच्या झाडाला धडक (Accident) देऊन पुढे स्वच्छतेचे काम करणाऱ्या छाया यांना फरपटत नेले. या भयानक घटनेत छाया यांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी छाया यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. याप्रकरणी पोलिसांनी कारचालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरू केला आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्यभर गाजत असलेल्या शिक्षक भरती आणि ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्याचा मुख्य सूत्रधाराच्या आवळल्या मुसक्या|VIDEO

Sangmeshwar Amba Ghat : संगमेश्वर-आंबा घाट मार्गावर दरड कोसळली, वाहतूक पूर्णत: ठप्प; कोकणात जाणाऱ्यांचे हाल

Viral Video: आधी कानाखाली मारली नंतर उचलून आपटल; उधारीवरून ग्राहक अन् दुकानदाराचं भांडण पेटलं, Video व्हायरल

Maharashtra Live Update: पुण्यातील बॉलर पबवर गुन्हा दाखल

Raj Kundra Video: "माझी एक किडनी तुमच्या नावावर..."; शिल्पा शेट्टीच्या नवऱ्याचं वचन, प्रेमानंद महाराज भावुक

SCROLL FOR NEXT