PUNE ₹88 CRORE INVESTMENT SCAM: AVINASH RATHOD EXTRADITED FROM DUBAI, SENT TO 10-DAY POLICE CUSTODY Saam Tv
मुंबई/पुणे

Pune : पुणेकरांना ८८ कोटींचा गंडा घालून दुबई गाठली, पुणे पोलिसांच्या जाळ्यात असा अडकला

Pune Crime News : पुण्यातील ८८ कोटी रुपयांच्या गुंतवणूक फसवणूक प्रकरणात तीन वर्षांपासून फरार असलेला एपीएस वेल्थ व्हेंचर्सचा संचालक अविनाश राठोड याला दुबईतून भारतात आणण्यात आले. पुणे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

Akshay Badve

  • पुण्यात गुंतवणूकदारांची तब्बल ८८ कोटी रुपयांची फसवणूक

  • मुख्य आरोपी अविनाश राठोड तीन वर्षे फरार

  • आरोपींना दुबईतून भारतात आणलं

  • पुणे न्यायालयाने आरोपींना १० दिवसांची पोलिस कोठडी सुनावली

पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. जादा परताव्याचे आमिष दाखवून कोट्यवधींची फसवणूक करून ३ वर्ष फरार असलेल्या तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. एपीएस वेल्थ व्हेंचर्स एलएलपी कंपनीचा संचालक अविनाश अर्जुन राठोडने जादा परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची तब्बल ८८ कोटी रुपयांची फसवणूक केली. त्यांनंतर तो तीन वर्षे फरार होता. त्याला दुबईतून भारतात आणण्यात आले आहे. पुणे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर न्यायालयाने दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एपीएस वेल्थ व्हेंचर्स एलएलपी कंपनीचा संचालक अविनाश अर्जुन राठोडने अनेक गुंतवणूकदारांना जादा परताव्याचे आमिष दाखवून तब्बल ८८ कोटी रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी एप्रिल २०२३ मध्ये पुण्यातील चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर या गुन्ह्याचा तपास आर्थिक व सायबर गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला. तपासादरम्यान, अविनाश राठोड, त्याची पत्नी विशाखा राठोड आणि इतर साथीदारांनी बाणेर येथील एपीएस वेल्थ व्हेंचर्स एलएलपी कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना जादा परताव्याचे आश्वासन देत मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केल्याचे समोर आले.

गुन्हा दाखल झाल्यानंतर अविनाश आणि विशाखा राठोड हे दोघेही परदेशात फरार झाले होते. त्यामुळे एप्रिल २०२४ मध्ये त्यांच्याविरोधात लुक आऊट नोटीस जारी करण्यात आली. विशेष एमपीआयडी न्यायालयाने अटक वॉरंट आणि जाहीर नोटीसही काढली होती. त्यानंतर जून २०२६ मध्ये दोघांविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली.

या नोटिशीच्या आधारे यूएई प्रशासनाने अविनाश राठोड याला ताब्यात घेत २३ जुलै २०२६ रोजी भारतात प्रत्यार्पित केले. दरम्यान, या आर्थिक घोटाळ्यातील इतर आरोपींचा शोध सुरू असून, विदेशात पलायन केलेल्या सर्व आरोपींना कायदेशीर प्रक्रियेद्वारे भारतात आणण्यासाठी पुणे पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मध्यप्रदेशातील रवी सीड्स अँड रिसर्च कंपनीविरोधात वर्ध्यात गुन्हा दाखल

Urine Infection : युरिन इन्फेक्शन झालंय? रोज खा 'हे' पदार्थ, वेदना अन् जळजळ होईल कमी

Breathing Problem : पावसाळ्यात सर्दीमुळे श्वास घ्यायला त्रास होतोय? बंद नाक मोकळे करण्यासाठी करा 'हा' रामबाण उपाय

Pandharpur: पंढरपूर हादरले! आषाढी यात्रेच्या बंदोबस्तावेळी पोलिसाची आत्महत्या, डोक्यात गोळी झाडून संपवलं आयुष्य

Monsoon Skin Care : पावसाळ्यात त्वचा निरोगी ठेवायचीये? मग घरीच बनवा हे फेस पॅक; चेहरा होईल टवटवीत

SCROLL FOR NEXT