Lonikand Police Station Saam Tv
मुंबई/पुणे

Pune iPhone stolen News : चोरट्यांचा तब्बल ६५ लाखांच्या iPhone वर डल्ला, पुण्यातील वाघोली भगातील घटना

Pune Crime News : वैभव झेंडे यांनी याप्रकरणी लोणी कंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

साम टिव्ही ब्युरो

अक्षय बडवे

Pune News : पुण्यात तब्बल १०५ आय फोन चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. ६५ लाख रुपयांचे iphone 14, iPhone 14 Pro हे मोबाईल कंपनीचं वेयर हाऊस फोडून चोरांनी पळवले आहेत. पुण्यातील वाघोली भगात ही घटना घडली आहे.

वैभव झेंडे यांनी याप्रकरणी लोणी कंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लोणी कंद पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १५ जुलै रोजी नेहमीप्रमाणे फिर्यादी हे वेअर हाऊस बंद करून निघून गेले. रात्री उशिरा अज्ञात चोरट्यांनी कनेक्ट सप्लाय चेन सोल्युशन कंपनीचे सीमा वेअर हाऊसचा सिमेंटचा पत्रा फोडून आतमध्ये प्रवेश केला. (Latest Marathi News)

आत प्रवेश करुन ६५ लाख रुपये किमतीचे अॅपल कंपनीचे आयफोन १३, आयफोन १४, आयफोन १४ प्रो या मॉडेलचे वेगवेगळे एकूण १०५ मोबाईल सेट व १ मोबाईल चार्जर ५ अॅडप्टर केबलसह लंपास केले. (Pune News)

दुसऱ्या दिवशी सकाळी वेअर हाऊस उघडल्यानंतर हा सगळा प्रकार लक्षात आला. फिर्यादी यांनी तात्काळ पोलिसात धाव घेतली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope: वाणीवर लक्ष द्या, पैशाचं टेन्शन कमी होईल; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

Arvind Kejriwal : आमचं सरकार आलं तर ५ दिवसांत E20 पेट्रोलवर बंदी; केजरीवाल यांची मोठी घोषणा

CJP New Team: कॉक्रोच जनता पार्टीमध्ये मोठा फेरबदल, नवीन सदस्यांची नियुक्ती, कुणाला मिळाली संधी?

Mysterious Fort : रहस्यांनी भरलेला प्राचीन किल्ला, 'या' गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील

SCROLL FOR NEXT