PUNE MURDER CASE: THREE FRIENDS ARRESTED FOR KILLING AKASH ZHAMBARE AFTER DRUNKEN ARGUMENT Saam tv
मुंबई/पुणे

Pune : पुणे हादरलं! दारू प्यायला बसले अन् वाद झाला; तिघांनी मिळून केली मित्राची हत्या

Pune Crime News : पुण्यातील काळेपडळ परिसरात दारू पिताना झालेल्या किरकोळ वादातून ३१ वर्षीय आकाश झांबरे याची मित्रांनी निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काळेपडळ पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली.

Alisha Khedekar

  • पुण्यात नशेत ३ मित्रांकडून जवळच्या मित्राची हत्या

  • काळेपडळ परिसरात दारू पिताना झालेल्या किरकोळ वादातून हत्या

  • डोक्यावर आणि तोंडावर सिमेंटचा दगड मारून तरुणाची हत्या

  • ४८ तासात पोलिसांनी आरोपींना ठोकल्या बेड्या

सचिन जाधव, पुणे

पुण्यातील काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. दारू पिताना झालेल्या किरकोळ वादातून मित्रांनीच आपल्या मित्राची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत तपासाची चक्रे फिरवत ३ आरोपींना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आकाश मारुती झांबरे (वय ३१, रा. होळकरवाडी, ता. हवेली) असे मृत तरुणाचे नाव आहे. आकाश हा आपल्या काही मित्रांसोबत दारू पित होता. त्यावेळी किरकोळ कारणावरून त्यांच्यामध्ये वाद झाला. हा वाद इतका वाढला की संतापाच्या भरात आरोपींनी आकाशवर हल्ला केला. आरोपींनी आकाशच्या डोक्यावर आणि तोंडावर सिमेंटचा दगड मारून त्याला गंभीर जखमी केले. या हल्ल्यात आकाश गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

घटनेची माहिती मिळताच काळेपडळ पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरील पुरावे, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध घेतला. या तपासात प्रथम आकाश भरेकर याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

तपासात पुढे संतोष बबन टकले आणि साहिल अर्जुन कचरावत यांनीही या खुनात सहभाग घेतल्याचे समोर आले. गुन्ह्यानंतर हे दोघे फरार झाले होते. मात्र पोलिसांनी तातडीने कारवाई करत गुन्हेगारांचा मागोवा काढत त्यांना ताब्यात घेतलं. काळेपडळ पोलिसांच्या जलद कारवाईमुळे अवघ्या ४८ तासांत खुनाचा उलगडा झाला. सध्या तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून अधिक चौकशी सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास काळेपडळ पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिकच्या सिन्नर बसस्थानक परिसरात मद्यधुंद तरुणाचा धिंगाणा

Agra Fort : आग्रा किल्ला हा 'लाल किल्ला' या नावाने का ओळखला जातो?

मॉइश्चरायझर ते वॉटरप्रूफ मेकअप; पावसाळ्यात कसं असावं तुमचं स्किनकेअर रूटीन? वाचा स्टेप्स

'चंद्रावर पिकनिकला चला' ५ जुलैला नऊ गावांचा अनोखा पिकनिक प्लॅन, रस्त्यामुळे नागरिक संतापले

Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांना पावसाळ्यात 'या' ५ आजारांचा धोका, वेळीच सतर्क व्हा

SCROLL FOR NEXT