PUNE FAKE BABA ARRESTED: 23-YEAR-OLD MOTIVATIONAL BABA DEMANDED OBSCENE PHOTOS saam tv
मुंबई/पुणे

पुणं बनतंय बाबाबुवा नगरी, 23 वर्षांच्या मोटीव्हेशनल बाबाच्या जाळ्यात तरुणी

23-Year-Old Self-Styled Motivational Baba: पुण्याला भोंदूबाबाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत चाललाय. काही दिवसांपूर्वीच पुण्यात भोंदूगिरीच्या नावाखाली लैंगिक शोषणाचा प्रकार उघडकीस आला होता. आता या स्वयंघोषित भोंदूबाबांनी चक्क सोशल मीडियाचा वापर करून विकृतीचा कळस गाठलाय... पाहूयात यावरचा हा रिपोर्ट...

Rohit Kadam

ऐकलंत... हा हँडसम मुलगा तुम्हाला मोटिवेशनल स्पीकर वाटत असला तरी या गोंडस चेहऱ्यामागे जे काही लपलंय ते पाहून तुमच्या तळपायातील आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही...तर हा आहे... पुण्यातील 23 वर्षीय स्वयंघोषित भोंदूबाबा दिव्य परमार...या स्वयंघोषित भोंदूबाबानं एका तरुणाला सापळ्यात अडकवल्याचा पर्दाफाश झालाय. या भोंदू परमारनं आपल्या शब्दजालात अडकवून आणि भीती दाखवून तरुणींकडून त्यांचे अश्लील फोटो मागवल्याचं उघड झालंय. पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच स्वयंघोषित भोंदू दिव्यनं मोटिवेशनल स्पीकर म्हणून स्वतःचा प्रचार सुरू केला. त्यानंतर मोटिशेवनल स्पीकर बनून हा भोंदू तरुणींना कसं जाळ्यात ओढायचा?.. तेही पाहा..

वयाच्या 18 व्या वर्षीच स्वयंघोषित भोंदू दिव्य परमारनं ठिकठिकाणी भाषणं द्यायला सुरुवात केली. कालांतराने सोशल मीडियावर स्वतःच्या नावाचे एक चॅनेल सुद्धा सुरू केलं. या चॅनलच्या माध्यमातून त्याने आपले फॉलोअर्स तयार केले. पुढे अशा फॉलोअर्सकडून शुल्क आकारून त्यांच्यासाठी व्याख्यान देऊ लागला. काही दिवसानंतर त्याने स्वतःला अध्यात्मिक गुरु म्हणून घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर आपल्या संपर्कातील महिला आणि तरुणींना व्यायाम विषयक टिप्सही देऊ लागला. आणि त्यातून 'तुमची व्यायामातील प्रगती करायची असेल तर अर्धनग्न फोटो पाठवा', अशी मागणी करून काळे कारनामे करून लागला.

या भोंदूच्या जाळ्यात आणखी किती मुली अडकल्या आहेत याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. मात्र शिक्षणाचं माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यात भोंदूगिरीचा महापूर आलाय. कधी धर्माचा आणि चमत्काराचा धाक दाखवून आर्थिक फसवणूक केली जातेय तर कुठे खरातसारखं लैंगिक शोषण केलं जातंय. त्यामुळे अशा भोंदूबाबांपासून सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एक गाडी, तीन मजली घर अन् पार्किंग चक्क गच्चीवर! बिहारचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

Maharashtra Drought Crisis: अर्ध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट; 19 जिल्ह्यातील 83 तालुक्यांना फटका

Political Leaders Retro Look: PM मोदी, राहुल गांधी ते उद्धव ठाकरेंपर्यंत...; नेत्यांचे फोटो 80sचा रेट्रो, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

'सरकारला जरांगे पाटलांना मारायचंय'; संजय राऊतांचा सरकारवर खळबळजनक आरोप

Maharashtra Politics: भाजप आणि शिंदेसेनेचे आमदार भिडले; महालेंनी डिवचलं, गायकवाडांनी धमकावलं

SCROLL FOR NEXT