Pune Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Shocking : Pune: २ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार, आईच्या प्रियकराचं भयंकर कृत्य; मालिश करायला सांगायचा अन्...

Pune Crime News : पुण्यात दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार प्रकरणात युवकाला अटक करण्यात आली आहे. आईच्या तक्रारीनंतर पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Alisha Khedekar

  • पुण्यात दोन अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरण उघड

  • आरोपीवर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

  • पोलिस तपास सुरू

  • मुलींच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह

सचिन जाधव, पुणे

पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. २ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आले आहेत. पती पासून विभक्त झाल्यानंतर निवाऱ्यासाठी प्रियकरासोबत राहणाऱ्या महिलेच्या या २ मुली आहेत. संबंधित तरुणानेच मुलींवर अत्याचार केला असल्याचे उघड झाले असून पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर आरोपी विरोधात पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला पतीपासून विभक्त राहत असून तिला १५ आणि १४ वर्षाच्या दोन मुली आहेत. घटस्फोटानंतर राहत घर सोडून महिलेने निवासासाठी प्रियकरासोबत राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर महिलेने तरुणासोबत सोबत राहणे सुरू केले होते. मात्र सदर महिला कामानिमित्त बाहेर असताना तरुणाने त्याचा गैरफायदा घेत तिच्या मुलींसोबत घाणेरडे कृत्य केले.

आरोपी तरुण मुलींना विविध कामाच्या निमित्ताने बोलवत होता. मालिश करून देण्याच्या नावाखाली त्यांनी दोन्ही मुलींची गैरप्रकार केल्याचे उघड झाले आहे. शिवाय धाकट्या मुलीवर अत्याचार करण्याचाही प्रयत्न केला असल्याचा आरोप आहे. घटनेची माहिती कोणाला दिल्यास वडिलांकडे परत पाठवण्याची धमकी देऊन आरोपींनी मुलींना गप्प बसवण्याचा प्रयत्न केला.

मात्र त्याचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला. घाबरलेल्या पीडित मुलींनी आई घरी आल्यावर तिला घडलेला सगळा प्रकार सांगितला. या घटनेनंतर क्षणाचाही विलंब न करता महिलेने तरुणाविरोधात तक्रार दाखल केली. महिलेच्या तक्रारीनंतर विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलीस या घटनेचा सविस्तर तपास करत असून या घटनेने पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षितेतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा

Good News: मोठी बातमी! यापुढे कर्जमाफीत रकमेची मर्यादा नाही, २५ लाख शेतकऱ्यांना होणार फायदा

विद्यार्थ्यांना गॅलरीत बसून शिक्षण घेण्याची वेळ, मुंबईतील हायस्कूलमधील धक्कादायक प्रकार; कारण काय?

DRDO Recruitment: डीआरडीओमध्ये नोकरीची संधी; ७६४ पदांसाठी भरती; पगार १,१२,४०० रुपये; अर्ज कसा करावा?

EVM हॅकिंगसाठीच मतमोजणी लांबणीवर'; काँग्रेसचा भाजपवर मोठा आरोप

SCROLL FOR NEXT