तमाशाला परवानगी आणि आर्थिक मदत द्या अन्यथा...आत्मदहन! Saam TV
मुंबई/पुणे

तमाशाला परवानगी आणि आर्थिक मदत द्या अन्यथा...आत्मदहन!

महाराष्ट्र लोककला असलेल्या तमाशा परवानगी मिळाली आणि फडमालकांनी कर्ज काढुन फड उभे केले आणि राज्यभरातुन कलावंत तमाशा फडात दाखल झाले.

रोहिदास गाडगे

पुणे: गेल्या तीन वर्षापासुन महाराष्ट्राची लोककला असलेल्या तमाशाचा तमाशा होऊन बसल्याने फड मालकांसह कलावंतांवर उपासमारीची वेळ आली असताना यंदा उभारी घेण्याच्या तयारीत असताना पुन्हा एकदा तमाशाला ब्रेक लागला आहे, त्यामुळे तमाशा कलावंताच्या उभारीसाठी तमाशाला परवानगी आणि आर्थिक मदत द्या अन्यथा उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बंगल्यासमोरच आत्मदहन करण्याचा इशारा तमाशा परिषदेचे अध्यक्ष रघुवीर खेडकरांनी दिला आहे.

महाराष्ट्र लोककला असलेल्या तमाशा परवानगी मिळाली आणि फडमालकांनी कर्ज काढुन फड उभे केले आणि राज्यभरातुन कलावंत तमाशा फडात दाखल झाले अशातच कोरोनाच्या तिस-या लाटेच्या संभाव्य धोक्यामुळे गावजत्रा यात्रा उत्सवावर बंदी आली आणि तमाशाला पुन्हा ब्रेक लागला आता तमाशाच्या उभारनीसाठी लावलेला पैसा कसा भरुन काढणार, कलावंत पुन्हा बेरोजगार होणार असल्याने आज तमाशा पंढरी म्हणुन ओळख असलेल्या नारायणगावात अखिल भारतीय तमाशा परिषदेच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.

तमाशा परिषदेचे अध्यक्ष रघुवीर खेडकरांनी राज्य सरकारकडे मदतीचा हात मागितला आहे. फड मालकांनी तमाशा उभारणीसाठी कर्जाने पैसा उभा केला आहे, त्यात नव्याने संकट उभं राहिलं आहे. त्यातच आता तमाशा कलावंत बेरोजगार होणार असल्याने राज्य सरकारने मदतीचा हात द्यावा अन्यथा आम्हाला आत्मदहनाशिवाय पर्याय नाही असा इशाराच राज्य सरकारला दिला आहे. यावेळी तमाशा परिषदेचे अध्यक्ष रघुवीर खेडकर, उपाध्यक्ष-आविष्कार मूळे, मोहित नारायणगावकर, मालती इनामदार, शिवकन्या बढे, मंगला बनसोडे, संजय महाडिक, कैलास तांबे उपस्थित होते.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supermoon Date And Time: चंद्र येणार पृथ्वीच्या अगदी जवळ... सुपरमून दिसणार, कधी आणि किती वाजता? जाणून घ्या

Hindu Wedding Ritual: लग्नामध्ये नवरी वराच्या डाव्या बाजूला का बसते? कारण काय?

शीतल तेजवानीच्या मुसक्या आवळल्या, गोरगरिबांच्या जमिनी हडपणाऱ्या मास्टरमाईंडचे काळे कारनामे समोर

Samantha Ruth Prabhu: समांथा रूथ प्रभूच्या लग्नातले अनसीन फोटो व्हायरल, पाहा सुंदर PHOTO

भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करा; चंद्रकांत पाटील यांची मागणी| नेमके प्रकरण काय? VIDEO

SCROLL FOR NEXT