Rahul Gandhi  Saam Tv
मुंबई/पुणे

Congress : कॉंग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस; राहुल गांधींच्या अध्यक्षपदाला चव्हाणांचा विरोध

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी याला विरोध केला आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेसच्या (Congress) अध्यक्ष पदाच्या चर्चा सुरू आहेत. त्यातच अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून सध्या पक्षांतर्गत वातावरण तापताना दिसत आहेत. एकीकडे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने राहुल गांधी यांना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारावे असा ठराव मंजूर केला असताना, दुसरीकडे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी याला विरोध केला आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना काँग्रेस अध्यक्ष करण्याचा ठराव मंजूर केला आहे. प्रदेशाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, प्रदेश कोषाध्यक्ष, एआयसीसी प्रतिनिधी निवडीचे अधिकार काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना देण्याचा प्रस्तावासह सर्व लोकप्रतिनिधींनी एकमताने मंजूर केलेला हा प्रस्ताव माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मांडला होता.

मात्र, या बैठकीत राहुल गांधी यांच्या बिनविरोध काँग्रेस अध्यक्ष होण्याच्या ठरावाला कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी विरोध केला आहे. त्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतलेली ही भूमिका काँग्रेस अध्यक्ष पदाची निवडणूक व्हावी, तसेच राहुल गांधी यांनी निवडणुकीत भाग घ्यावा अशी आहे.

१७ ऑक्टोबर रोजी होणार निवडणूक

दरम्यान, काँग्रेस अध्यक्षपदासाठी १७ ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे. या कार्यक्रमांतर्गत उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया २४ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत चालणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख तारीख ८ ऑक्टोबर आहे. १७ ऑक्टोबरला निवडणुका होणार असून १७ ऑक्टोबरला निकाल लागणार आहे

तामिळनाडू काँग्रेस कमिटीने मांडला प्रस्ताव

तामिळनाडू काँग्रेस कमिटीने सोमवारी एकमताने एक ठराव मंजूर करून राहुल गांधींना पक्षाचे नेतृत्व करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. TNCC अध्यक्ष के.एस. अलागिरी यांनी पक्षाच्या राज्य युनिट जनरल कौन्सिलच्या बैठकीत एक ठराव मांडला आणि राहुल गांधींना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती केली. हा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला.

"TNCC अध्यक्ष केएस अलागिरी यांनी मांडलेल्या ठरावात AICC अध्यक्षपदासाठी राहुल गांधी यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता आणि हा ठराव TNCC च्या जनरल कौन्सिलने एकमताने मंजूर केला होता." अशी माहिती TNCC ने ट्विट करुन दिली आहे. याअगोदर गुजरात, छत्तीसगडसह अनेक राज्य काँग्रेस समित्या आणि राजस्थानने राहुल गांधींना नेतृत्व करण्यासाठी आग्रह करणारे ठराव पारित केले आहेत.

Edited By -Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: अचलपुरात बच्चू कडूंना मोठा धक्का; भाजपचे प्रवीण तायडे विजयी

UdyanRaje Bhosle News : उदयन राजेंची शरद पवारांवर विखारी टीका, पाहा Video

Viral Video: बापरे! खोल विहिरीत महिलांनी घेतला झोका; VIDEO व्हायरल होताच नेटकरी झाले हैराण

Health Diet: तुमच्या रोजच्या आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश असणे महत्वाचे आहे? जाणून घ्या फायदे

Jharkhand Assembly Election Result: महाराष्ट्रात सेंच्युरी करणाऱ्या भाजपचा झारखंडमध्ये का झाला पराभव; काय आहेत कारण?

SCROLL FOR NEXT