prasad lad saamtv
मुंबई/पुणे

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 'मन की बात' घरा-घरात पोहचवणार"

भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांच्यावर पक्षाने दिली जबाबदारी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

-- सुशांत सावंत

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘ मन की बात ‘ महाराष्ट्रातल्या घरा घरात पोचवणार असल्याची माहिती भाजप नेते प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी दिली. लाड यांच्यावर प्रदेश भाजपनं पंतप्रधान मोदी यांच्या 'मन कि बात' ह्या कार्यक्रमाच्या प्रचार-प्रसाराची जबाबदारी प्रसाद लाड यांच्यावर प्रदेश भाजपने दिली आहे.

हे देखील पहा :

याबद्दल बोलताना लाड म्हणाले, ३० जानेवारी २०२२ पर्यंत ७५ हजार बुथपर्यंत 'मन कि बात' हा कार्यक्रम पोचवणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जनतेबद्दलच्या भावना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्याचं प्रयत्न यानिमित्ताने करणार आहे. या कामाचा शुभारंभ उद्याच करणार असून प्रत्यक्ष कामकाजाला सुरूवात देखील उद्यापासून होणार आहे.

या कार्मक्रमासंदर्भात देवेंद्र फडणवीस आणि संघटनमंत्री श्रीकांत भारतीय यांच्याबरोबर उद्या एक VC बैठकही पार पडणार असून यामध्ये सविस्तर चर्चा होईल. मुंबई महानगर पालिका आणि राज्यातील निवडणूकांच्या पार्श्वभुमीवर महापालिकेतही ‘ मोदी ब्रॅंन्ड ‘ साठी भाजपची जोरदार तयारी सुरु आहे. राज्यातील प्रत्येक छोट्या छोट्या ठिकाणांपासून भाजपची संघटनात्मक बांधणीवर भर असणार आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

7 Days Stop Watching Reels: 7 दिवस रील्स न पाहिल्यास शरीरात काय बदल होतात? जाणून घ्या

Shweta Tiwari: श्वेता तिवारीचा अचानक यू-टर्न? आधी मनसेवर केले गंभीर आरोप, आता राज ठाकरेंचे मानले आभार

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट! 'या' महिलांना मिळणार नाही हप्ता; तुमचं यात नाव नाही ना?

Maharashtra News Live Update: एमपीएससी पेपर फुटी प्रकरणात मुंबई पोलिसांकडनं तपासाला गती

एका दिवसात ATM मधून किती पैसे काढू शकतो? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT