Pune News
Pune News Twitter
मुंबई/पुणे

Video: संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

देहू - पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते जगदगुरु संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी मोठ्या संख्येने वारकरी याठिकाणी उपस्थित होते. या कार्यक्रमाची महिनाभरापासून तयारी सुरु आहे. त्यामुळे सर्वांनाच या कार्यक्रमाची उत्सुकता लागली होती. येथे उपस्थित वारकऱ्यांमध्येही आनंदाचे वातावरण आहे. अखेर आज या मंदिराचे लोकार्पण झालं आहे. यावेळी वारकऱ्यांनी संत तुकराम महाराजांचा नामघोष केला.

तुकोबारायांची गाथा इंद्रायणी नदीत बुडवल्यानंतर दीकाठच्या दगडी शिळेवर बसून तुकोबारायांनी १३ दिवस अनुष्ठान केले. तुकाराम महाराजांनी 13 दिवस अन्नपाणी ग्रहण केलं नाही. तुकाराम महाराज 13 दिवस त्या शिळेवर अनुष्ठानासाठी बसले होते, तीच शिळा भाविकांच्या दर्शनासाठी तपोवन महाराजांनी देहू येथील मंदिरात आणून ठेवली होती. त्या शिळेवर भव्यदिव्य मंदिर असावे असा आग्रह वारकरी संप्रदायाचा होता. म्हणून देहूतील मुख्य मंदिरात ही स्थापीत केली असून मंदिरास शिळा मंदिर असे संबोधले जात आहे.

नव्याने बांधलेले शिळा मंदिर संपूर्ण दगडात आहे. मंदिराला २ सुवर्ण कळस आहेत. मुख्य गाभारा, मंडप यासह मंदिराच्या चार कोपऱ्यावर चार कळस आहेत. तर मंदिरावर 36 कळस स्थापन करण्यात आले आहेत. शिळा मंदिरातील संत तुकोबांच्या मूर्तीची उंची 42 इंच आहे. संत तुकाराम महाराजांचं आयुष्यमान 42 वर्षाचं असल्याने मूर्तीची उंची 42 इंच आहे. ही मूर्ती 42 दिवसांमध्ये साकारण्यात आली आहे. ही मूर्ती शिल्पकार चेतन हिंगे, पिंपरी चिंचवड यांनी तयार केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Report : जिकडे तिकडे नोटाच नोटा! मंत्र्याच्या सचिवाकडे कोटींचं घबाड

Special Report : मराठी Vs गुजराती मुंबईत वातावरण तापलं, शिवसैनिकांना नो एंट्री!

MI vs SRH: मुंबईने हैदराबादचं वादळ रोखलं! पलटणला जिंकण्यासाठी १७४ धावांचं आव्हान

Today's Marathi News Live: सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार सभा

Maharashtra Politics : ...मग बघू कोणाची हिंमत होते; 'नोकरीत मराठी माणूस नको' पोस्टनंतर मनसे आक्रमक

SCROLL FOR NEXT